Gas Cylinder Delivery ग्राहकांनी सिलेंडरसाठी नंबर लावल्यानंतर ग्राहकांच्या मोबाईलवर ओटीपी येतो. हा ओटीपी संबंधीत एजन्सीकडून मोबाईलवरून ग्राहकांकडून मागविल्या जाते आणि सिलेंंडर बांगडापूर येथे नेमून दिलेल्या दुकानातून घेऊन जाण्यास सांगितले जाते. मात्र, ओटीपी दिल्यानंतर ग्राहकांना सिलेंडरसाठी हेलपाट्या माराव्या लागते. सोबतच नियमानुसार रकमेपेक्षा जास्त पैसेही घेतल्या जात असल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे.
तालुयातील ग्रामीण परिसरातील नागरिकांना सुमन भारत गॅस एजन्सी, आंजी मोठी अंतर्गत भारत कंपनीच्या सिलेंडरचे वितरण करण्यात येते. त्याकरिता एजन्सीने बांगडापूर परिसरातील गावात सिलेंडर वितरण करण्याची जवाबदारी तेथील स्थानिक नागरिकाकडे दिली आहे. मात्र, या व्यतीचा ग्राहकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. अनेक ग्राहकांकडून नियमानुसार असलेल्या रकमेपेक्षा जास्त पैसे घेतले जात असल्याची तक्रार असून ग्राहकांना फोनवरून डिलिव्हरीचा ओ. टी. पी. मागीतल्या जातो. बांगडापूर येथील नेमून दिलेल्या दुकानातून सिलेंडर घेऊन जाण्यास सांगिलते जाते. पण, प्रत्यक्षात तिथे गेल्यावर ग्राहकांना सिलेंंडर दिल्या जात नाही. याबाबत प्रश्न विचारणार्या ग्राहकांना उद्धट वागणूक दिली जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
Gas Cylinder Delivery शनिवार ३० रोजी आजनडोह येथील महेश ढोले हे सिलेंडर घेण्याकरिता गेले. त्यांच्याकडून गॅस सिलेंडरची डिलिव्हरी झाल्याचा ओ. टी. पी. २० मे रोजीच घेण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात सिलेंंडर दिले नाही. याबाबत त्यांनी विचारणा केली असता संबंधित व्यतीने त्याच्याशी अरेरावीची भाषा वापरून धकाबुकी, शिवीगाळ करीत दुकानाबाहेर हाकलून दिल्याचे ढोले यांनी सांगितले. तक्रारीनुसार ग्राहकांना अपमानास्पद वागणूक दिली जाते. अनेक नागरिकांना शिवीगाळ करून हाकलण्यात येते. त्यामुळे या एजन्सी अंतर्गत येणार्या गावातील नागरिक त्रस्त झाले असून संबंधित विभागाने याची दखल घ्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.