मुंबईचा माजी कर्णधार, लखनौचा नवा सरदार?

    दिनांक :30-May-2026
Total Views |
मुंबई,
Hardik Pandya आयपीएल २०२७ हंगामाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगू लागली आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या पुढील हंगामात लखनौ सुपर जायंट्समध्ये दाखल होऊन संघाचे नेतृत्व स्वीकारू शकतो, अशी अटकळ व्यक्त केली जात आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
 
Hardik Pandya
 
लखनौ सुपर जायंट्सने आयपीएल २०२६ मध्ये अपेक्षेप्रमाणे कामगिरी करण्यात अपयश आल्याने संघात मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संघाचा कर्णधार ऋषभ पंत याने नेतृत्वाची जबाबदारी सोडण्याची इच्छा व्यक्त केल्याचे वृत्त समोर आल्यानंतर नवीन कर्णधार कोण असेल, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. Hardik Pandya या शर्यतीत हार्दिक पांड्याचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे.
 
सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनासोबत हार्दिकचे काही मुद्द्यांवर मतभेद झाल्याच्या चर्चा आहेत. यामुळे त्याने कर्णधारपद सोडण्याचा विचार केल्याचे सांगितले जात आहे. Hardik Pandya जर हार्दिकने नेतृत्वाची जबाबदारी सोडली, तर तो संघ बदलण्याचाही निर्णय घेऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत ट्रेड प्रक्रियेद्वारे त्याचा लखनौ संघात प्रवेश होऊ शकतो.
 
हार्दिक पांड्याला आयपीएलमधील नेतृत्वाचा चांगला अनुभव आहे. गुजरात टायटन्सला यश मिळवून दिल्यानंतर त्याची मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईला अपेक्षित यश मिळाले नाही. दुसरीकडे, ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालीही लखनौला सलग हंगामांमध्ये प्लेऑफ गाठता आलेले नाही. त्यामुळे आगामी हंगामापूर्वी दोन्ही संघांमध्ये मोठे बदल पाहायला मिळू शकतात. Hardik Pandya हार्दिक पांड्या खरोखरच मुंबई इंडियन्सला निरोप देऊन लखनौ सुपर जायंट्समध्ये दाखल होणार की या सर्व चर्चा केवळ अफवा ठरणार, याकडे आता क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.