- तावशी ते ईटखेडा मार्गावरील घटना : परिसरात खळबळ
गोंदिया,
Human skull found in the forest जंगलात रानभाजी तोडण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला झुडपीत मानवी कवटी आढळून आल्याची घटना अर्जुनी मोरगाव तालुक्यातील तावशी - ईटखेडा मार्गावरील जंगल शिवारात 29 मे रोजी दुपारी 12 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून अनेक चर्चांना पेव फुटले आहे.
Human skull found in the forest मिळालेल्या माहितीनुसार तावशी येथील हरीचंद अत्वारी बघवा हा जंगलात रानभाजी तोडण्यासाठी गेला असता भाजी तोडत असताना झुडपीमध्ये एक मानवी कवटी पडून असल्याचे दिसून आले. त्याने लगेच गावाकडे धाव घेत गावचे पोलिस पाटील पंकज कापगते, फिरोज अल्ताफ पठाण व गावकर्यांना हा प्रकार सांगितला. त्यांनी लगेच जंगल शिवारात येत घटनेची माहिती अर्जुनी मोरगाव पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता जंगलात कवटी व्यतीरिक्त इतर अवयव कुठेही दिसून आले नाही. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. यावेळी अर्जुनी मोरगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी व फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले. सदर कवटी मृत व्यक्तीची असून पोलिसांनी जप्त केली आहे. याप्रकरणी फिरोज अल्ताफ पठाण रा. तावशी यांच्या तक्रारीवरून अर्जुनी मोरगाव पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक कमलेश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक घनश्याम तांबे करीत आहेत.