मुंबई,
IPL 2026 आयपीएल २०२६ चा अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार असून क्रिकेटप्रेमींचे लक्ष केवळ विजेतेपदावरच नाही तर ऑरेंज आणि पर्पल कॅपच्या शर्यतीकडेही लागले आहे. हंगामभर धावांचा आणि विकेट्सचा पाऊस पाडणाऱ्या खेळाडूंमध्ये या मानाच्या पुरस्कारांसाठी अखेरच्या क्षणापर्यंत चुरस कायम आहे.
ऑरेंज कॅपसाठी सध्या राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी आघाडीवर आहे. त्याने हंगामात सर्वाधिक धावा केल्या असल्या तरी त्याचा संघ स्पर्धेबाहेर गेला आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सचे कर्णधार शुभमन गिल आणि सलामीवीर साई सुदर्शन यांच्याकडे ही कॅप हिसकावून घेण्याची मोठी संधी आहे. IPL 2026 गिल आणि सुदर्शन दोघांनीही यंदाच्या हंगामात सातत्यपूर्ण फलंदाजी करत धावांचा डोंगर उभारला आहे. त्यामुळे अंतिम सामन्यातील त्यांच्या खेळीवर ऑरेंज कॅपचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.
दुसरीकडे, गोलंदाजांमधील पर्पल कॅपची शर्यतही तितकीच रोमांचक ठरली आहे. बराच काळ या यादीत अव्वल असलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळूरचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार अखेरच्या टप्प्यात मागे पडला. गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने महत्त्वाच्या सामन्यात अतिरिक्त बळी मिळवत पर्पल कॅपवर कब्जा केला. IPL 2026 मात्र अंतिम सामन्यात भुवनेश्वरकडे पुनरागमनाची संधी आहे. त्याने निर्णायक सामन्यात प्रभावी गोलंदाजी करत अधिक विकेट्स घेतल्या तर पर्पल कॅप पुन्हा त्याच्या नावावर होऊ शकते.
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात ट्रॉफीसाठीची लढत जितकी रंगतदार ठरली, तितकीच वैयक्तिक पुरस्कारांसाठीची स्पर्धाही चाहत्यांच्या चर्चेचा विषय बनली आहे. IPL 2026 आता अंतिम सामन्यानंतरच ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपचे अंतिम मानकरी कोण ठरणार, याचा फैसला होणार आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींना रविवारी दुहेरी रोमांच अनुभवायला मिळणार आहे.