अहमदाबाद,
IPL 2026 आयपीएल २०२६ चा अंतिम सामना ३१ मे रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगणार आहे. आरसीबीने क्वालिफायर १ जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला असून, गुजरात टायटन्सने क्वालिफायर २ मध्ये राजस्थान रॉयल्सवर मात करत अंतिम सामन्यात स्थान निश्चित केले आहे. मात्र अंतिम सामन्यापूर्वीच हवामानाचा अंदाज चाहत्यांची चिंता वाढवत आहे, कारण पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आयपीएलच्या नियमांनुसार अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. त्यामुळे नियोजित दिवशी सामना पूर्ण होऊ शकला नाही, तर तो पुढील दिवशी खेळवला जाईल. IPL 2026 दोन्ही दिवस मिळून सामना पूर्ण करण्यासाठी अतिरिक्त वेळ दिला जातो आणि गरज पडल्यास षटकांची संख्या कमी करून सामना पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र कोणताही निर्णय लागण्यासाठी किमान पाच षटकांचा खेळ होणे आवश्यक असते.
सामना सुरू झाल्यानंतर पावसामुळे खेळ थांबला आणि पुढे सुरू ठेवणे शक्य नसेल, तर निकाल डकवर्थ-लुईस पद्धतीने लावला जातो. हवामानामुळे किमान पाच षटकांचाही खेळ होऊ शकला नाही, पण वेळ उपलब्ध असेल, तर सुपर ओव्हरद्वारे विजेता ठरवण्याची तरतूदही नियमांमध्ये आहे. IPL 2026 मात्र अंतिम दिवस आणि राखीव दिवस दोन्ही दिवशी सामना पूर्णपणे रद्द झाला, तर लीग टप्प्यात अव्वल स्थानी असलेल्या संघाला विजेता घोषित केले जाते.
या परिस्थितीत आरसीबी आणि गुजरात यांच्यात सामना रद्द झाला, तर लीग टेबलमध्ये अव्वल असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला थेट विजेतेपद दिले जाईल. IPL 2026 त्यामुळे पावसाने खेळ बिघडवला तरी आरसीबीच्या चाहत्यांसाठी आशेचा किरण कायम राहू शकतो. आरसीबी यंदा पाचव्यांदा अंतिम फेरीत पोहोचली आहे आणि आतापर्यंत एकदा विजेतेपद मिळवले आहे, तर गुजरात टायटन्सनेही आतापर्यंत एक विजेतेपद पटकावले असून ही त्यांची तिसरी अंतिम फेरी असेल. दोन्ही संघ दुसरे आयपीएल जेतेपद जिंकण्याच्या प्रयत्नात असून, अंतिम सामना अत्यंत रोमांचक होण्याची अपेक्षा आहे.