हिंगणघाट,
Mahajan Mumbai Institute येथील मुक्या प्राण्यांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या जीवरक्षक फाउंडेशनला समस्त महाजन मुंबई संस्थेकडून ४१ हजार रुपयांची आर्थिक मदत प्रदान करण्यात आली. समस्त महाजन संस्था राज्यातील विविध गोशाळा, पांजरपोळ तसेच प्राण्यांच्या निवारा केंद्रांना सातत्याने मदत करत असते. जीवरक्षक फाउंडेशन हिंगणघाटच्या कार्याचा आढावा घेतल्यानंतर संस्थेच्या प्रतिनिधींना मुंबई येथे बोलावण्यात आले.
Mahajan Mumbai Institute फाउंडेशनतर्फे जखमी, आजारी व बेवारस प्राण्यांसाठी करण्यात येणार्या सेवाकार्याची माहिती जाणून घेत समस्त महाजन संस्थेने आर्थिक मदत जाहीर केली. यावेळी समस्त महाजन संस्थेच्या पदाधिकार्यांनी, जीवरक्षक फाउंडेशन हे मुया जीवांसाठी अत्यंत उल्लेखनीय कार्य करत आहे. भविष्यातही संस्था कोणत्याही संकटात सापडल्यास आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असा विश्वास व्यत केला. जीवरक्षक फाउंडेशनचे राकेश झाडे यांनी या मदतीबद्दल समस्त महाजन मुंबई संस्थेचे आभार मानले. या निधीचा उपयोग मुया प्राण्यांच्या उपचार, खाद्य व्यवस्था आणि निवारा सुविधांसाठी करण्यात येणार असल्याचे सांगितले.