महाराष्ट्र बाेर्डाला निकालाची घाई; गुणपत्रिकांची मात्र दिरंगाई!

-20 दिवसांनंतरही दहावीच्या मूळ गुणपत्रिका नाहीत -अकरावी प्रवेश प्रक्रियेत गाेंधळ

    दिनांक :30-May-2026
Total Views |
नागपूर,
maharashtra board राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी-बारावीचे निकाल विक्रमी वेगाने जाहीर केले असले तरी विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिका मिळण्यात हाेत असलेल्या विलंबामुळे अकरावी प्रवेश प्रक्रियेत माेठा गाेंधळ निर्माण झाला आहे. दहावीचा निकाल 8 मे राेजी जाहीर हाेऊन 20 दिवसांहून अधिक कालावधी उलटला तरी विद्यार्थ्यांच्या हातात मूळ गुणपत्रिका पाेहाेचलेल्या नाहीत.
 

maharashtra board 
 
बारावीचा निकाल 2 मे राेजी जाहीर झाला हाेता. मात्र विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिका 25 मेनंतर मिळाल्या. दहावीच्या विद्यार्थ्यांना अद्यापही गुणपत्रिकांची प्रतीक्षा करावी लागत आहे. दरम्यान, 29 मे राेजी अकरावी प्रवेशासाठी पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाल्याने प्रवेशासाठी आवश्यक असलेली मूळ गुणपत्रिका आणि शाळा साेडल्याचा दाखला (टीसी) नसल्यामुळे विद्यार्थ्यांसमाेर अडचणी निर्माण झाल्या आहेत.
 
अनेक विद्यार्थी अलाॅटमेंट लेटर घेऊन महाविद्यालयात प्रवेशासाठी गेले असता त्यांच्याकडे मूळ कागदपत्रांची मागणी करण्यात आली. मात्र बाेर्डाकडून गुणपत्रिका न आल्याने शाळांकडून टीसीही देण्यात आलेली नसल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया पूर्ण करता आली नाही.maharashtra board या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने दहावीची गुणपत्रिका आणि टीसी अनिवार्य करू नयेत, असे निर्देश कनिष्ठ महाविद्यालयांना दिले आहेत. शिक्षकांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
संकेतस्थळाच्या तांत्रिक अडचणींचाही फटका
अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना अर्जाचा दुसरा भाग भरण्यात माेठ्या अडचणींचा सामना करावा लागला. बाेर्डाचे संकेतस्थळ वारंवार बंद पडत असल्याने अनेक वेळा मुदतवाढ द्यावी लागली. परिणामी 20 मे राेजी अपेक्षित असलेली पहिली प्रवेश यादी तब्बल नऊ दिवस उशिरा 29 मे राेजी जाहीर करण्यात आली.

निकाल जाहीर करताना विदर्भातील तापमानाचा विचार करणेही राज्य शासनाने गरजेचे आहे. पुढील वर्षापासून दहावी-बारावीचे निकाल 1 जूनपूर्वी जाहीर करू नयेत, तसेच अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी संकेतस्थळ व्यवस्थापनाचे काम टीसीएससारख्या अनुभवी संस्थेकडे साेपवावे.
प्रा. सपन नेहराेत्रा
विभागीय महामंत्री, शिक्षक भारती संघटना