नवी दिल्ली,
NIA राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) केरळच्या मलप्पूरममध्ये अवैध स्फोटकांचा साठा जप्त केल्याच्या प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्था अर्थात् एनआयएने शनिवारी केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये 19 ठिकाणी छापे टाकले. यावेळी संशयितांचे घर आणि कार्यालयाची तपासणी करून त्यांची चौकशी करण्यात आली.
केरळच्या तिरुरंगडी येथे अलिकडेच स्फोटकांनी भरलेला एक ट्रक जप्त करण्यात आला. याप्रकरणी दाखल गुन्हा दाखल झाल्यानंतर संबंधित प्रकरण एनआयएकडे सोपवण्यात आले. तपासाचा भाग म्हणून एनआयए पथकाने एकाच दिवशी तीन राज्यातील 19 ठिकाणी छापे टाकले. तिरुरंगडी येथील एका गोदामातून ट्रकमध्ये स्फोटके लादण्यात आले होते, त्या ठिकाणी आणि ट्रक मालकाच्या घरावर छापा टाकण्यात आला. याशिवाय स्फोटकाशी संबंधित अटक करण्यात आलेले आरोपी, व्यावसायिक, कंपन्यांच्या कार्यालयातही शोधमोहीम राबवण्यात आली. मलप्पुरम जिल्ह्यातील तिरुरंगडी आणि वांडूर, कोझिकोड जिल्ह्यातील एरंजीमावू आणि कन्नूर व कासारगोड जिल्ह्यांमधील अनेक ठिकाणी कारवाई करण्यात आली. स्फोटकांची अवैध वाहतूक आणि त्यात सहभागी असलेल्यांच्या हेतूंबद्दल माहिती मिळवणे, हा या तपासाचा उद्देश असल्याचे एनआयएच्या एका अधिकाऱ्यांने NIA वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.आरोपींच्या मालकीच्या कंपन्यांव्यतिरिक्त, संशयितांशी संबंधित आस्थापनांचीही चौकशी केली जात आहे.
प्रकरण काय आहे?
फेब्रुवारी महिन्यात पोलिसांनी चेम्माडमध्ये कांदे घेऊन जाणाèया एका ट्रकमधून मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त केली. वाहनातून 10,500 हून अधिक जिलेटीनच्या कांड्या, डेटोनेटर्स आणि तारा जप्त करण्यात आल्या. तपासादरम्यान पोलिसांनी ट्रकची मालकीण असलेल्या एका महिलेला ताब्यात घेतले. याप्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला आहे.