वर्धा,
‘palakmantri karyalay aaplya dari’ पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या विशेष पुढाकारातून ‘पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी’ हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत हनुमान मंदिर परिसर प्रभाग १ येथे नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी तसेच लाभार्थ्यांच्या अर्ज प्रक्रियेसंदर्भात मार्गदर्शन करण्याकरिता शिबिराचे आयोजन करून पालकमंत्री कार्यालय आपल्या दारी उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी पालकमंत्री कार्यालयाचे योगेश देशमुख, यश आगे, रवी डोमाले, आकाश चावके, ऋषिकेश तहकिक, पियूष गांगरेडीवार, नयन करे यांच्यासह नप माजी बांधकाम सभापती निलेश किटे, नगरसेवक सतिश मिसाळ, नगरसेवक उज्ज्वला पेठे, प्रफुल्ल शर्मा, गुंजन मिसाळ, आशिष मिश्रा व परिसरातीलल नागरिक उपस्थित होते. यावेळी शिबिरात विविध शासकीय योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली. लाभार्थ्यांच्या अर्ज प्रक्रियेसंदर्भात मार्गदर्शन आणि आवश्यक सहाय्य करण्यात आले. तसेच नागरिकांकडून योजनेच्या लाभाकरिता अर्ज भरण्यात आले.
palakmantri karyalay aaplya dari’ राज्य शासनामार्फत राबाविण्यात येत असलेल्या विविध योजना सर्वसामान्याच्या दारापर्यंत पोहोचविण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला असून या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून अशा शिबिरांच्या माध्यमातून प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा अधिक सक्षम होत असल्याचे पालकमंत्री कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे.