- नागपुरातील 28 पाेलिस अधिकाऱ्यांचा समावेश
अनिल कांबळे
नागपूर,
Police Inspectors' Transfers गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या पाेलिस अधिकाऱ्यांच्या सर्वसामान्य बदल्यांची यादी पाेलिस महासंचालक कार्यालयाकडून शुक्रवारी सायंकाळी जाहीर झाली. यामध्ये राज्यातील 508 सहायक पाेलिस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. बदल्यांची यादी जाहीर हाेताच ‘कहीं खुशी-कहीं गम’ असे वातावरण निर्माण झाले आहे.
Police Inspectors' Transfers सूत्रांच्या माहितीनुसार, मे महिन्यांच्या पहिल्याच आठवड्यात पाेलिस अधिकाऱ्यांच्या सर्वसामान्य बदल्या हाेणे अपक्षित हाेते. मात्र, पाेलिस महासंचालक आणि आस्थापना विभागात याेग्य समन्वय नसल्यामुळे बदल्या हाेऊ शकल्या नाही. मात्र, महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात आस्थापना विभागाने गांभीर्य दाखवून सहायक पाेलिस निरीक्षकांच्या बदल्यांची यादी जाहीर केली. त्यामुळे आता पाेलिस अधिकाèयांना नवनियुक्त ठिकाणी रुजू हाेऊन आपल्या पाल्यांच्या शैक्षणिक बाबतीत विचार करण्यास वेळ मिळाला. बदल्यांची यादी जाहीर झाल्यामुळे आता राज्य पाेलिस दलात आनंद व्यक्त केल्या जात आहे. सहायक पाेलिस निरीक्षकांच्या विनंती बदल्यांचीही यादी जाहीर झाली असून 108 सहायक पाेलिस निरीक्षकांना त्याचा लाभ मिळाला आहे. सध्या पाेलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकाèयांच्या बदल्यांच्या यादीची अद्यापही प्रतीक्षा आहे. पाेलिस निरीक्षकांच्या बदल्यांसाठा काही पाेलिस निरीक्षकांनी महासंचालक कार्यालयात आणि गृहमंत्रालयात ‘सेटिंग’ केल्याची चर्चा आहे.
28 अधिकारी नागपुरातून बाहेर
शहर पाेलिस आयुक्तालयाताली तब्बल 28 सहायक पाेलिस निरीक्षकांची बाहेर जिल्ह्यात बदली झाली आहे. त्या प्रमाणात नागपुरात बदली हाेऊन येणाऱ्या अधिकाऱ्यांची संख्या कमी आहे. तपास अधिकारी कमी झाल्यामुळे उपलब्ध पाेलिस अधिकाऱ्यांवर तपास आणि बंदाेबस्ताचा ताण वाढणार आहे.