नाल्यांची तातडीने सफाई करा : डॉ. आरती फुपाटे
पुसद,
Pusad Municipal Council शहरामध्ये सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून मान्सूनपूर्व नाल्या व गटारांची आवश्यक सफाई अद्याप करण्यात आलेली नाही. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही बाब अत्यंत गंभीर असून पुसद नगर परिषद प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या पुसद जिल्हाध्यक्ष डॉ. आरती फुपाटे यांनी केली आहे. या संदर्भात नप मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. निवेदनामध्ये पुसद शहरातील नाल्यांची स्वच्छता, जागोजागी साचलेली घाण उचलणे, तसेच अलीकडे हटविण्यात आलेले अतिक्रमण कायमस्वरूपी हटवून ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे.
डॉ. फुपाटे यांनी, पुसद नगर परिषदेमध्ये सध्या भाजपा युतीची सत्ता असताना नागरिकांना शहरातील स्वच्छता व मूलभूत सुविधांबाबत अपेक्षा आहेत. मात्र प्रत्यक्षात शहरातील अनेक भागांमध्ये घाणीचे ढीग, तुंबलेले नाले आणि अस्वच्छ वातावरण दिसून येत आहे. भाजपाच्या गटनेत्यांनी यापूर्वी दोन वेळा स्मरणपत्रे देऊन प्रशासनाचे लक्ष वेधले होते, तरीही अपेक्षित कार्यवाही झालेली नाही. हवामान खात्याच्या अंदाजानुसार जून महिन्याच्या पहिल्या-दुसèया आठवड्यात पावसाची शक्यता असून, त्यापूर्वी नाल्यांची व पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहाची साफसफाई न झाल्यास शहरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. अनेक भागांमध्ये पावसाचे पाणी साचून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची तसेच डेंग्यू, मलेरिया व इतर साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Pusad Municipal Council त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने तातडीने विशेष स्वच्छता मोहीम राबवून सर्व नाले, गटारे व सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता करावी, शहरातील कचèयाची विल्हेवाट लावावी आणि हटविण्यात आलेले अतिक्रमण पुन्हा होणार नाही यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी डॉ. आरती फुपाटे यांनी केली आहे. प्रशासनाने त्वरित कारवाई न केल्यास भारतीय जनता पार्टीच्या वतीने नागरिकांच्या हितासाठी रस्त्यावर उतरून व्यापक स्वच्छता जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. निवेदन नप मुख्याधिकाèयांना देण्यात आले. यावेळी डॉ. आरती फुपाटे, जिल्हा सरचिटणीस अॅड. आदित्य माने, निळकंठ पाटील, अनिरुद्ध पाटील, अर्चना जगताप, अश्विनी जिल्हेवार, दीपाली जाधव, दीपक काळे, शिवाजी खडसे, राजू जगताप, कैलास गावणार, विक्रांत जिल्हेवार, महेश काळे, सूरज कुरील, प्रीती गवरशेट्टीवार व वैभव उबाळे उपस्थित होते.