रेल्वे प्रकल्प कामगारांसाठी आरोग्य तपासणी शिबिर

    दिनांक :30-May-2026
Total Views |
मुळावा प्राथमिक आरोग्य केंद्राचा स्तुत्य उपक्रम
शेकडो कामगारांची आरोग्य चाचणी

उमरखेड, 
Railway Project: Health Check-up Camp तालुक्यातील तरोडा फाटा येथे विकास निगम अंतर्गत सुरू असलेल्या रेल्वे प्रकल्पावर कार्यरत कामगारांसाठी शनिवार, 30 मे रोजी विशेष भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन मुळावा प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे करण्यात आले. या शिबिराचे आयोजन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष ढोले यांच्या मार्गदर्शनात व मुळावा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल दवणे यांच्या पुढाकाराने करण्यात आले .
 
 
Health Check
 
कामगारांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिरामध्ये असंसर्गजन्य आजार तपासणी अंतर्गत रक्तदाब, रक्तातील साखर, ईसीजी तपासणी करण्यात आली. तसेच कुष्ठरोग व क्षयरोग तपासणीही करण्यात आली. त्याचठिकाणी संशयित रुग्णांच्या छातीचे एक्स-रे काढून पुढील उपचारासाठी मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी उपजिल्हा रुग्णालयामार्फत एचआयव्ही तपासणी व समुपदेशनही करण्यात आले. कामगारांना संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांबाबत जनजागृती करून आरोग्यदायी जीवनशैलीचे महत्त्व पटवून देण्यात आले. या शिबिरास जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सागर जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील दुबे यांनी भेट दिली व उपक्रमाचे कौतुक केले .
 
 
 
Railway Project: Health Check-up Camp  शिबिरासाठी मुळावा येथील आरोग्य सहायक विनोद घुगे, शिवाजी शिरामे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील वानखेडे, डॉ. निलम लेकुळे, प्रयोगशाळा वैज्ञानिक सुरेश राठोड, आरोग्यसेवक ज्ञानदीप वानोळे, सूरज पराते, प्रल्हाद सोनटक्के, रवींद्र शिंदे, फ्लेबोटोमिस्ट आशा पवार, दौलत चव्हाण, स्वयंसेवी आरोग्य मित्र सुदेश खिल्लारे, शांतदीप हरणे तसेच ग्रामीण रुग्णालयाच्या समुपदेशक वैशाली धोंगडे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ अमित जाधव, ग्रामीण समस्या मुक्तीचे माधव कल्याणकर आणि त्यांच्या चमूने परिश्रम घेतले. या उपक्रमामुळे रेल्वे प्रकल्पातील कामगारांना त्यांच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली असून, विविध आजारांचे लवकर निदान व उपचारासाठी हे शिबिर महत्त्वपूर्ण ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.