ग्रामविकास हाच राष्ट्राच्या प्रगतीचा केंद्रबिंदू

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन - रणजीतबाबू देशमुख ग्रामविकास पुरस्कार-2026’ प्रदान

    दिनांक :30-May-2026
Total Views |
नागपूर, 
rural development गावे आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्याशिवाय देशाची सर्वांगीण प्रगती हाेऊ शकत नाही. त्यामुळे ग्रामविकास हाच राष्ट्राच्या प्रगतीचा केंद्रबिंदू असून लाेकसहभागातूनच खèया अर्थाने विकास साधता येताे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. माजी ग्रामीण विकास मंत्री रणजीतबाबू देशमुख यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त आरडी ाउंडेशनर्ते आयाेजित ‘रणजीतबाबू देशमुख ग्रामविकास पुरस्कार-2026’ वितरण साेहळ्यात ते बाेलत हाेते. ग्रामीण विकासाच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नऊ ग्रामपंचायती व संस्थांचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्रत्येक पुरस्कारार्थी संस्था व ग्रामपंचायतीला एक लाख रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. वनामती येथील सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.
 

rural development 
 
 
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, रणजीत देशमुख यांनी राज्यासह नागपूर जिल्ह्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. विविध पदांवर अत्यंत धडाडीने काम करत त्यांनी उत्तम प्रशासक म्हणून नावलाैकिक मिळवला. ग्रामविकास मंत्री म्हणून त्यांनी जलसंधारणासह विविध याेजनांमध्ये शिस्त आणि सुसूत्रता आणली. 73 वी आणि 74 वी घटनादुरुस्ती राज्यासमाेर प्रभावीपणे मांडत जिल्हा परिषदांना अधिक अधिकार मिळवून देणे तसेच महिलांचे प्रतिनिधित्व वाढविणे, ही त्यांची महत्त्वाची कामगिरी राहिली.
 
विदर्भाच्या प्रश्नावर त्यांची कायम ठाम भूमिका राहिली. 2004 मध्ये पश्चिम नागपूर विधानसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसच्या जाहीरनाम्यात विदर्भाचा उल्लेख नसल्याने त्यांनी स्वतःचे निवडणूक कार्यालय बंद केले हाेते. त्यातून त्यांच्या भूमिकेची प्रामाणिकता दिसून येते, असेही फडणवीस यांनी नमूद केले. अध्यक्षीय भाषणात ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गाेरे यांनी म्हणाले, विविध क्षेत्रांतील कामगिरीसाठी दिले जाणारे हे पुरस्कार या उपक्रमाची व्यापकता दर्शवित असल्याचे सांगितले.
महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही या उपक्रमाचे काैतुक करत ग्रामविकास ही व्यापक चळवळ व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.rural development यावेळी माजी ग्रामीण विकास मंत्री रणजीतबाबू देशमुख यांची प्रमुख उपस्थिती हाेती. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते रणजीत देशमुख आणि त्यांच्या पत्नी रुपाताई देशमुख यांचा मानचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
 
आरडी फाउंडेशनचे अध्यक्ष आमदार डाॅ. आशिष देशमुख यांनी प्रास्ताविकातून पुरस्कारामागील संकल्पना स्पष्ट केली. ग्रामीण भागात उल्लेखनीय कार्य करणाèया ग्रामपंचायती आणि संस्थांचा गाैरव करून इतर गावांनाही प्रेरणा देण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी पुरस्कारासाठी ग्रामपंचायतींची निवड करतानाचे अनुभव मांडले. कार्यक्रमाला माजी गृहमंत्री अनिल देशमुख, अशाेक धाेटे, सुनीता गावंडे, संध्या गाेतमारे, निशा सावरकर आदी उपस्थित हाेते.
कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे शेतीत नवे परिवर्तन
गावपातळीवर सकारात्मक परिवर्तन घडविणाऱ्या कार्यकर्त्यांना समाजासमाेर आणण्याचा हा प्रयत्न आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे शेती आणि ग्रामीण व्यवस्थापनात माेठे बदल हाेत असून शेतकरी प्रगतीच्या नव्या वाटा शाेधत आहेत. विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींना या पुरस्कारामुळे नवे बळ मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
-----------
ग्रामविकास पुरस्काराचे मानकरी
ग्रामपंचायत उमरी भरतपूर (ता. सावनेर) - लाेकसहभाग क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य
ग्रामपंचायत विरली (ता. उमरेड) - गुन्हेगारीमुक्त गाव, दारूबंदी व महिला संरक्षण क्षेत्रातील कार्य
ग्रामपंचायत तराेडी (ता. कामठी) - सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन व पर्यावरण क्षेत्रातील कार्य
ग्रामपंचायत खुर्सापार (ता. काटाेल) - ‘जलसमृद्ध गाव’ संकल्पना प्रभावीपणे राबविल्याबद्दल
ग्रामपंचायत आष्टीकला (ता. कळमेश्वर) - उपजीविका क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, चणकापूर (ता. सावनेर) - शिक्षण क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रम व ‘ज्ञानवर्धिनी शाळा’ कार्यासाठी
प्राथमिक आराेग्य केंद्र, भिष्णूर (ता. नरखेड) - आराेग्य क्षेत्रातील उल्लेखनीय सेवेसाठी
ग्रामपंचायत धामणा (ता. माैदा) - आदर्श ग्रामपंचायत
जेएसडब्ल्यू फाउंडेशन, कळमेश्वर - ग्रामविकासासाठी सातत्यपूर्ण सीएसआर याेगदानाबद्दल