आठ मजूर जखमी, स्मशानभूमी जवळील घटना
समुद्रपूर,
Samudrapur Accident शहरातील आठ शेतमजुरांना धुमनखेडा येथे शेतातील फणे गोळा करण्यासाठी गेले होते. दरम्यान, दुपारच्या सुमारास शेतातून घरी परत येत असताना समुद्रपूरजवळील स्मशानभूमीजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन पलटी झाले. यात आठही शेतमजूर जखमी झाले. ही घटना शनिवार ३० रोजी दुपारच्या सुमारास घडली. विमल पुंडलिक गिरोले (५०), आम‘पाली दिलीप बडवाई (४०), अपर्णा रविंद्र उनपाने (४०), प्रीती विलास मेश्राम (४०), सोनाबाई किशोर गजभिये (६३) कल्पना सुभाष मेश्राम (४०) मिना गजू टेंभरे (४०) आणि विमल कुंडलिक गिरोले (५५) अशी जखमींची नावे आहे.
Samudrapur Accident सध्या शेतकर्यांची उन्हाळवाहीची कामे सुरू आहे. धुमनखेडा येथील शेतातील फणे गोळा करण्यासाठी समुद्रपूर शहरातील आठ मजूर गेले होते. दुपारी उन्ह जास्त असल्याने ते सर्व मजूर एम. एच. ३२ यू. ०५९५ या टाटा एस वाहनाने परत गावाकडे निघाले. दरम्यान, समुद्रपूर शहराजवळील स्मशानभूमीजवळ येताच चालकाचे नियंत्रण सुटल्याने अनियंत्रित होऊन वाहनाने दोन पलट्या घेतल्या. यात शेतमजूर जखमी झाले. जखमींना समुद्रपूर ग‘ामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी प्रीती मेश्राम यांना जास्त मार लागल्याने त्यांना सेवाग‘ाम येथील कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. घटनेची माहिती समुद्रपूर पोलिसांना दिली असून पुढील सुरू आहे