दिग्रस,
Satish Tayde's Resignation सहकार क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करून सलग 25 वर्षे दिग्रस कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सतीश तायडे यांनी सभापतीपदाचा राजीनामा दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. आपल्या प्रेमळ स्वभाव, प्रशासनाचा अभ्यास, शेतीविषयी जिव्हाळा यासाठी सुपरिचित सतीश तायडे हे मूळचे दिग्रस तालुक्यातील लाख रायाजी येथील त्यांचे वडील रामराम पाटील हे एक आदर्श शेतकरी म्हणून परिचित आहेत. तायडे परिवार गोरगरीब, गरजू लोकांना नेहमीच मदत करत आलेला आहे.
Satish Tayde's Resignation सतीश तायडे हे खासदार संजय देशमुख यांचे ते आमदार व राज्यमंत्री होते तेव्हापासूनच जिवलग सहकारी आहेत. दिग्रस नगर परिषद अध्यक्ष म्हणूनसुद्धा सतीश तायडे यांचा कार्यकाळ चांगला राहिला आहे. अचानक सभापतीपदाचा राजीनामा दिल्याबद्दल सतीश तायडे यांना विचारले असता प्रकृतीच्या कारणासाठी राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितले. मात्र हेच कारण की आणखी काही, यावरून चांगलीच चर्चा रंगली आहे. जिल्हा निबंधकांकडे त्यांनी आपला राजीनामा सोपवला असून तो मंजूर झाला आहे.