सेवाग्राम स्थानकावर ट्रॅफिक ब्लॉक, काही गाड्या रद्द

    दिनांक :30-May-2026
Total Views |
वर्धा, 
Sevagram Railway Station मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात नागपूर-—सेवाग्राम दरम्यान तिसरी व चौथी रेल्वे लाईनच्या कामांतर्गत सेवाग्राम स्थानकावर इलेट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली व यार्ड रिमॉडेलिंगचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी ३० मे ते ६ जून २०२६ दरम्यान विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार असून या कालावधीत काही रेल्वे गाड्या रद्द, शॉर्ट टर्मिनेट तसेच काही गाड्यांचे थांबे रद्द राहणार आहेत.
 
 
seva
 
Sevagram Railway Station  ६ जून रोजी गाडी क‘मांक ६११०९ वर्धा—नागपूर मेमू, ६१११० नागपूर—वर्धा मेमू, १२२१९ अमरावती-अजनी एसप्रेस आणि १२१२० अजनी-अमरावती एसप्रेस या गाड्या पूर्णतः रद्द राहतील. तसेच १२८१० हावडा—छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एसप्रेस आणि ६१११० नागपूर—वर्धा मेमू या गाड्यांचा सेवाग्राम स्थानकावरील थांबा ३० मे ते ६ जूनदरम्यान रद्द करण्यात आला आहे. नागपूर स्थानकावरील प्लॅटफॉर्म क‘मांक २ बंद असल्यामुळे कोचिंग परिचालनावरील परिणामाचा कालावधी ५२ दिवसांवरून ६१ दिवसांपर्यंत वाढविण्यात आला आहे. त्यामुळे ३० मे ते ७ जूनदरम्यान अतिरिक्त नऊ दिवस रेल्वे वाहतुकीवर परिणाम राहणार आहे. दरम्यान, ११२०३ नागपूर—मडगाव एसप्रेस ही ३० मे ते ६ जूनदरम्यान अजनी स्थानकावर शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल. तर ११२०४ मडगाव—नागपूर एसप्रेस ही ३१ मे ते ७ जूनदरम्यान अजनी स्थानकावरूनच सुटणार आहे. मध्य रेल्वे नागपूर विभागाने प्रवाशांना प्रवासापूर्वी संबंधित गाड्यांची अद्ययावत माहिती तपासूनच प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.