अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

    दिनांक :30-May-2026
Total Views |
गर्भवती झाल्यानंतर घटना उघडकीस

अनिल कांबळे
नागपूर, 
Sexual Assault  अल्पवयीन विद्यार्थिनीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार करण्यात आला. ती गर्भवती झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. मानकापूर पाेलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
 
Assault
 
Sexual Assault  विवान उफर् लकी खांडेकर (20, मानकापूर) असे आराेपीचे नाव आहे. अल्पवयीन विद्यार्थिनी 17 वर्षांची असून ती बारावीत शिकते. विवान व पिडीत मुलगी यांची तीन वर्षांअगाेदर ओळख झाली हाेती. त्यांच्यात मैत्री झाली व विवानने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्याने तिच्या घरी कुणीच नसताना तिच्यावर अत्याचार केला. नंतर अनेकदा असा प्रकार झाला. हे कृत्य अनेक महिन्यांपासून सुरू हाेते. त्यानंतर ताे तिला गाेरेवाडा येथील एका हाॅटेलमध्ये घेऊन गेला व लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केला. काही दिवसांअगाेदर तिची प्रकृती बिघडली व पाेटात दुखू लागले. तिला रुग्णालयात नेले असता तिला दिवस गेल्याची बाब समाेर आली. डाॅक्टरांनी तिचे कुटुंबीय व पाेलिसांना माहिती दिली. कुटुंबियांनी विश्वासात घेऊन विचारणा केली असता तिने विवानचे नाव सांगितले. पाेलिसांनी आराेपीविराेधात गुन्हा दाखल करत अटक केली आहे.