मविआ उमेदवाराचे नामांकन दाखल

    दिनांक :30-May-2026
Total Views |
विधान परिषदेची अमरावती निवडणूक
भाजपा उमेदवाराचा अर्ज सोमवारी
 
अमरावती, 
sthanik swarajya sanstha matadarsangh nivadanuk अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणूक २०२६ साठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार तथा काँग्रेस पदाधिकारी हर्षजीत देशमुख यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी खासदार बळवंत वानखेडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, शहराध्यक्ष बबलू शेखावत, माजी आमदार वीरेंद्र जगताप, मनपा विरोधी पक्षनेते विलास इंगोले, माजी महापौर मिलिंद चिमोटे, शिवसेना उबाठाचे जिल्हाप्रमुख पराग गुडधे, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शपचे जिल्हाध्यक्ष हेमंत देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक प्रमुख नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
 
 
nivadanuk
 
यावेळी उपस्थित नेत्यांनी हर्षजीत देशमुख यांना शुभेच्छा देत आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला. उमेदवारी दाखल केल्यानंतर हर्षजीत म्हणाले, आम्ही केवळ शक्तिप्रदर्शनासाठी नव्हे, तर जनतेचा विश्वास आणि पाठिंबा घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहोत. मविआच्या सर्व घटक पक्षांचे सहकार्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांचा पाठिंबा आमच्यासोबत असून विजय निश्चित आहे. जिल्हाध्य बबलू देशमुख म्हणाले, मविआला शक्तिप्रदर्शनाची गरज नाही. आमची ताकद रस्त्यावरच्या गर्दीत नाही, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांमध्ये असलेल्या विश्वासात आणि आमच्या मजबूत संघटनात्मक बांधणीत आहे.
 
 
sthanik swarajya sanstha matadarsangh nivadanuk  आतापर्यंत एकूण ३८ इच्छुकांनी उमेदवारी अर्जाची उचल केली आहे. पण, अर्ज दाखल एकाच उमेदवाराने केला आहे. १ जून अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. त्या दिवशी भाजपा उमेदवाराचा अर्ज दाखल होणार आहे. अद्याप घोषण जरी झाली नसली तरी प्रवीण पोटे भाजपाचे उमेदवार राहतील. अन्य काही उमेदवार अर्ज भरतील. खरी स्थिती अर्ज मागे घेतल्यानंतरच स्पष्ट होईल.