अखेर सुधाकर भारसाकळे शिवसेनेत

    दिनांक :30-May-2026
Total Views |
अनेक पदाधिकार्‍यांचाही प्रवेश
काँग्रेसला दर्यापूर तालुक्यात खिंडार
 
दर्यापूर, 
Sudhakar Bharsakale Joins Shiv Sena गेल्या अनेक दिवसापासून चर्चा सुरू असलेले काँग्रेसचे दर्यापुरातील महत्त्वाचे नेते आणि तालुका काँग्रेस अध्यक्ष सुधाकर भारसाकळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. सुधाकर भारसाकळे यांच्या पक्ष प्रवेशाने दर्यापूरसह मतदार संघातील राजकारण बदलणार असल्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्यासह काँग्रेसच्या अनेक पदाधिकार्‍यांनी शिवसेनेत प्रवेश घेतला.
 
 
Sudhakar
 
दर्यापूर तालुक्यातील काँग्रेसशी संबंधित अनेक माजी व विद्यमान पदाधिकारी, सहकारी संस्थांचे संचालक तसेच विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना एकनाथ शिंदे गटामध्ये जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे दर्यापूरच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून शिवसेनेची तालुक्यातील संघटनात्मक ताकद वाढल्याचे मानले जात आहे.
 
 
Sudhakar Bharsakale Joins Shiv Sena  प्रवेश करणार्‍यांमध्ये माजी काँग्रेस पदाधिकारी, कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी-विक्री संघ, विविध सहकारी संस्थांचे संचालक, युवक काँग्रेसचे पदाधिकारी तसेच अल्पसंख्याक काँग्रेसशी संबंधित कार्यकर्त्यांचा समावेश आहे. प्रमुख प्रवेशकर्त्यांमध्ये सुधाकर भारसाकळे, दिलीप चव्हाण, गजानन जाधव, प्रभाकर कोरपे, राजू कराळे, गजानन देवतळे, साहेबराव भदे, राजेश खेडकर, राजेश राठी, अनिल भारसाकळे, मधुसूदन पाचे, संजय चांदूरकर, कैलास घडते, अमोल घमाळे, भैय्यासाहेब टेकाडे, संतोष भोंडे, रफीकउद्दीन सय्यद, जमीर खान पठाण, अमोल जाधव, सुरेश मानकर, नितीन लोडम, उमेशर साबळे, सतीश भारसाकळे, राधेश्याम भारसाकळे, युवराज तायडे, अक्षय भारसाकळे, राज पाटील, पवन पाचपोरे, कपिल पोटे, इमरान खान पठाण आणि सुधाकर खारोळे यांचा समावेश आहे.या घडामोडीमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तसेच तालुक्यातील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून दर्यापूरमधील राजकीय वातावरण अधिकच तापण्याची चिन्हे दिसत आहेत.