आर्णी,
Two-wheeler accident आर्णी-दिग्रस मार्गावरील नायरा पेट्रोलपंपासमोरील काठोडा फाट्याजवळ स्प्लेंडर दुचाकीला स्कूटीने धडक दिली. या धडकेत 65 वर्षीय इसमाचा घटनास्थळी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार, 29 मे रोजी रात्री 8.30 च्या सुमारास घडली. या अपघातातील मृतकाचे नाव परसराम धर्मा तागड (वय 65, डोळंबावाडी, ता. दिग्रस) असे आहे. घटनास्थळी पोलिसांनी पोहोचून नागरिकांच्या मदतीने परसराम तागड व स्कूटीचालकाला आर्णी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. दिग्रस येथील स्कुटीचालक मेहबूबखान यांना यवतमाळला उपचारार्थ दाखल केले आहे.
Two-wheeler accident परसराम तागड हे स्प्लेंडरने आर्णीकडून डोळंबावाडीकडे जात असताना विरुद्ध दिशेने येणाèया स्कूटीचालकाने त्याचे वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून तागडच्या दुचाकीला धडक दिली. यात परसराम तागड यांचा मृत्यू झाला. या धडकेत स्कुटीचालक मेहबूब खान (वय 36, दिग्रस) हा गंभीर जखमी झाला. मृत परसराम तागड यांचा मुलगा सुनील यांनी आर्णी ठाण्यात स्कूटी चालकाविरुद्ध तक्रार दिली. अधिक तपास ठाणेदार नीलेश सुरडकर यांच्या मार्गदर्शनात जमादार देवानंद मुनेश्वर करत आहेत.