आरोपांच्या वादळानंतर विनेशची विजयी झेप!

    दिनांक :30-May-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Vineshs Triumphant Leap आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी सुरू असलेल्या कुस्ती निवड चाचण्यांमध्ये अनुभवी महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने दमदार कामगिरी करत आपल्या मोहिमेची विजयी सुरुवात केली आहे. इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात तिने हरियाणाच्या ज्योतीवर ७-१ अशा फरकाने मात करत पुढील फेरीत प्रवेश मिळवला.
 
Vinesh
 
या निवड चाचण्यांपूर्वी विनेश फोगाटच्या वजनी गटावरून मोठा वाद निर्माण झाला होता. सुरुवातीला तिला ५० किलो वजनी गटातच खेळण्यास सांगण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता. Vineshs Triumphant Leap मात्र याला विनेशने तीव्र विरोध दर्शवत आपल्यावर अन्याय होत असल्याचा आरोप केला. अखेर झालेल्या चर्चेनंतर तिला तिच्या पसंतीच्या ५३ किलो वजनी गटात सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली.
 
सामन्याच्या सुरुवातीला दोन्ही खेळाडूंमध्ये सावध खेळ पाहायला मिळाला. मात्र काही वेळातच विनेशने आक्रमक भूमिका घेत प्रतिस्पर्धीवर दबाव निर्माण केला. Vineshs Triumphant Leap तिने प्रभावी डावपेचांचा वापर करत गुणांची आघाडी मिळवली आणि संपूर्ण सामन्यावर नियंत्रण ठेवले. ज्योतीला केवळ एक गुण मिळवता आला, तर विनेशने सात गुणांची कमाई करत एकतर्फी विजय नोंदवला.
 
दरम्यान, निवड चाचण्यांमध्ये सहभागी होण्याबाबतचा तिचा मार्ग अलीकडेच न्यायालयीन प्रक्रियेनंतर मोकळा झाला होता. त्यानंतर लगेचच तिने मैदानात उतरून आपली क्षमता सिद्ध केली. निवड चाचण्यांपूर्वी बोलताना विनेशने आणखी काही वर्षे स्पर्धात्मक कुस्ती सुरू ठेवण्याची इच्छा व्यक्त केली होती. Vineshs Triumphant Leap तसेच निवड प्रक्रियेदरम्यान काही अडचणींना सामोरे जावे लागल्याचा दावा करत तिने व्यवस्थापनावर नाराजीही व्यक्त केली होती. वाद आणि अडथळ्यांच्या पार्श्वभूमीवर मिळवलेला हा विजय विनेश फोगाटसाठी महत्त्वाचा मानला जात असून, आशियाई क्रीडा स्पर्धेतील स्थान मिळवण्याच्या तिच्या प्रयत्नांना यामुळे बळ मिळाले आहे.