वैनगंगेत रेतीबंधार्‍याचे काम युद्धपातळीवर

    दिनांक :30-May-2026
Total Views |
गडचिरोली, 
ऐन उन्हाळ्यात Wainganga River वैनगंगा नदीपात्रातील पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात खालावल्यानंतर गडचिरोली शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था कोलमडली असून नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. गेल्या
pollen दोन ते तीन दिवसांपासून अनेक भागांतील नळ कोरडे पडल्याने नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. या गंभीर परिस्थितीवर मात करण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने नदीपात्रात तात्पुरत्या स्वरूपाचा रेतीबंधारा उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे.
 
 
 
Wainganga River  27 मेपासून पोकलेन, जेसीबी आणि हायवा वाहनांच्या सहाय्याने वैनगंगा नदीपात्रात रेती-माती टाकून बंधारा उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. नदीतील उपलब्ध पाणी अडवून जलसाठा वाढविणे आणि शहराच्या जलउपसा केंद्राजवळ पुरेसे पाणी उपलब्ध करून देणे, हा या उपाययोजनेमागील मुख्य उद्देश आहे. पालिका प्रशासनाच्या माहितीनुसार, बंधार्‍याचे काम 2 जूनपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असून त्यानंतर 3 जूनपासून शहरातील पाणीपुरवठा पूर्ववत आणि नियमित होईल, असा दावा करण्यात आला आहे. तोपर्यंत शहरात मर्यादित स्वरुपाचा पाणी पुरवठा होणार आहे.
 
 
गोसेखुर्दचे पाणी वैनगंगेत सोडणार
वैनगंगा नदीतील जलपातळी सातत्याने घसरत असल्याने शहरातील पाणी संकट अधिक तीव्र झाले आहे. या पृष्टभूमीवर नगर परिषदेकडून गोसेखुर्द प्रकल्पातील पाणी वैनगंगा नदीत सोडण्याची मागणी करण्यात आली आहे. नगरपालिकेच्या वतीने सहपालकमंत्री तसेच जिल्हाधिकार्‍यांना पत्र पाठवून पुढील आठवड्यात गोसेखुर्द धरणातील पाणी वैनगंगा नदी पात्रात सोडण्याची विनंती करण्यात आली आहे. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेला मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.