वर्धा,
Commercial Cylinder नालवाडी येथील नागसेननगरात तीन दिवसांपूर्वी एका कॅटरिंग व्यावसायिकावर कारवाई करीत घरगुती वापराचे १९ सिलेंडर जप्त केल्याचा व्हॉट्सअॅपवर मॅसेज फिरत आहे. प्रशासन मात्र चुप्पी साधुन आहे. ‘त्या’ कारवाई संदर्भात केलेल्या कारवाईचा फिरत असलेली माहिती खोटी आहे का? असा सवाल उपस्थित झाला आहे.

मागील चार महिन्यांपासून आखाती देशात युद्ध सुरू असल्याने जगभरात इंधनासह गॅस सिलेंडरचा तुटवडा आहे. याचा फटका सर्वसामान्यांसह लहान मोठ्या व्यावसायिकांना बसत आहे. आधी नंबर लावताच दोन दिवसात घरी येणार्या सिलेंडरची मर्यादा आता ४५ दिवसांची करण्यात आली असून व्यावसायिक सिलेंडरवरही मर्यादा घालण्यात आली आहे. सिलेंडरअभावी किरकोळ व्यावसायिकांनी खाद्यपदार्थांचे दरही वाढविले आहे. सिलेंडर मुबलक प्रमाणात मिळत नसल्याने अनेकांनी आपला व्यवसाय चुलीवर थाटला. काहींनी गोबर गॅसचा वापर सुरू केला तर अनेक मोठ्या हॉटेल व्यावसायिकांकडून इलेट्रिक शेगड्यांचा वापर सुरू आहे. ऐन लग्नाच्या हंगामात सिलेंडर तुटवडा जाणवल्याने कॅटरिंग व्यवसाय पूर्णत: धोक्यात आला होता. या व्यावसायिकांनासुद्धा सिलेंडर तुटवड्याचा मोठा फटका बसला. इंधनासह गॅस तुटवड्यात काळाबाजारी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली. प्रत्येक तालुयात एक असे आठ पथकं तयार करून लहान मोठ्या हॉटेल व्यावसायिकांची तपासणी करण्यात आली. सुरूवातीला काही व्यावसायिकांवर कारवाई करीत सिलिंडर जप्ती करण्यात आली. मात्र, आता हा जप्तीचा खेळ जवळ जवळ बंदच झाल्याचे दिसून येत आहे.
असाच एक प्रकार तीन दिवसांपूर्वी नागसेननगरात उघडकीस आल्याचा मॅसेज काही व्हॉट्सअॅप ग्रुपवर फिरताना दिसत आहे. कॅटरिंग व्यवसायिकांमध्ये दबया आवाजातही चर्चा आहे. नागसेननगरातील एका कॅटरिंग व्यावसायिकावर संबंधित विभागाने धाड टाकून घरगुती वापराचे १९ सिलेंडर जप्त केल्याची चर्चा आहे. शहरात सिलिंडर जप्तीची कारवाई झाली का, असे अन्न पुरवठा निरीक्षण अधिकारी मनीषा माजरखेडे यांना विचारले असता अशी कोणतीही कारवाई झाली नसल्याचे सांगण्यात आले. तर अन्न व औषध पुरवठा विभागाच्या अधिकार्याशी संपर्क साधला असता कारवाई पुरवठा अधिकारी कार्यालय व पोलिसांकडून केली असावी, असे सांगितले.Commercial Cylinder त्यामुळे व्हॉट्सअॅप ग्रुपवर फिरत असलेल्या कारवाईच्या मॅसेजची अफवा खोटी आहे का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
कारवाई शांत बस्त्यात?
चहा टपरी, हॉटेल आणि कॅटरिंग व्यावसायिक, मेस यासारख्या व्यावसायासाठी व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा केला जातो. त्यामुळे सुरूवातीला या व्यवसायासाठी तुटवडा काळात कुणीही घरगुती सिलेंडर वापरू नये म्हणून पथकांनी अनेक ठिकाणी धाडी टाकून कारवाई केल्या. आता मात्र, त्या थंडबस्त्यात आहेत. व्यावसायिक सिलेंडरचे दर हजाराच्या जवळपास वाढल्याने ते परवडणारे नसल्यामुळे व्यावसायिक घरगुती सिलेंडरचा वापर करतात. दरम्यान, नागसेननगरात कॅटरिंग व्यावसायिकावर धाड टाकून १९ घरगुती सिलेंडर जप्त केल्याचा मॅसेज व्हायरल होत असून ही कारवाईही थंडबस्त्यात गेल्याची ओरड आहे.