सलग दुसऱ्या दिवशी दारू अड्ड्यांवर छापे

    दिनांक :31-May-2026
Total Views |
- 50 दारू विक्रेत्यांवर गुन्हे दाखल : पाेलिसांना उशिरा आली जाग !

अनिल कांबळे
नागपूर, 
Illegal Liquor Sales पिंपरी-चिंचवडमध्ये विषारी दारुमुळे घडलेल्या प्रकारानंतर नागपूर पाेलिसांना जाग आली असून गेल्या दाेन दिवसांपासून शहरातील दारु अड्ड्यांवर छापे घालणे सुरु केले आहे. पाेलिसांनी शहरात अवैध दारू विक्रीचा सुळसुळाट वाढल्यानंतर विशेष माेहीम सुरू केली आहे. माेहीमेच्या दुसèया दिवशी पाेलिसांनी विविध पाेलिस ठाण्यांच्या हद्दीत धाडी टाकून माेठ्या प्रमाणात अवैध देशी, विदेशी आणि माेहुलाची दारू जप्त केली. कारवाईत पाेलिसांनी 50 विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करीत दाेन लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
 
 
daru
 
माेहिमेत गुन्हे शाखेसह जिल्ह्यातील एकूण 24 पाेलिस ठाण्यांच्या पथकांनी सहभाग घेतला. पाेलिसांनी यशाेधरानगर, काेराडी, खापरखेडा, इमामवाडा, शांतीनगर, सदर, लकडगंज, पाचपावली, कळमणा, वाठाेडा, तहसील, हिंगणा, सक्करदरा, कामठी, भांडेवाडी, नंदनवन, वाडी, एमआयडीसी, साेनेगाव, जरीपटका, पारडी, हुडकेश्वर, सिताबर्डी आणि अंबाझरी पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील संशयास्पद अड्ड्यांवर छापे टाकले. कारवाई दरम्यान पाेलिसांनी सुशिल मेश्राम, घनश्याम नारनवरे, विजय नायडू, रेखा डाेंगरवार, ललिताबाई माेहाडीकर, अशुंसलाल पवार यांच्यासह अनेक महिला व पुरुष आराेपींना दारूसाठा बाळगताना पकडले. हिंगणा हद्दीतील चंद्रपूर रिठी गावात पाेलिसांनी सर्वात माेठी कारवाई करत 40 लिटर माेहुलाची दारू, 5 ड्रम सडवा आणि इतर साहित्यासह एकूण 1 लाख 21 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. माेहिमेअंतर्गत दारूबंदी कायद्यान्वये एकूण 50 केसेसमध्ये 50 आराेपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या सर्व कारवायांमध्ये आराेपींच्या ताब्यातून एकूण 2 लाख 14 हजार 076 रुपयांचा मुद्देमाल पाेलिसांकडून जप्त करण्यात आला.
 
 
दारु अड्ड्यांवर पाेलिसांची कृपा?

Illegal Liquor Sales पाेलिस आयुक्त डाॅ.रविंद्रकुमार सिंगल यांनी अवैध दारु विक्री बंद करण्याचे आदेश ठाणेदारांना दिले हाेते. मात्र, आयुक्तांच्या आदेशानंतरही शहरात विविध ठिकाणी अवैध दारु अड्डे सुरु हाेते. हे सर्व दारुअड्डे ठाणेदारांच्या कृपेने सुरु हाेते, अशी चर्चा सुरु आहे. पिंपरी-चिंचवडमधील घटना घडल्यामुळे नाईलाजाने छापे घालून दारु अड्डे बंद करण्यात येत असून अवैध दारु विक्रीतून पाेलिसांचे ‘अर्थकारण’ बिघडले, अशी चर्चा आहे. संबंधित दारु अड्डेसंचालकांच्या माेबाईल क्रमांकाचा ‘सीडीआर’ काढल्यास अनेक पाेलिसांची नावे समाेर येण्याची शक्यता आहे.