वर्धा,
Agarwal Wins Local Body Elections एकच मिशन शेतकरी आरक्षण हा विषय घेऊन काँग्रेसमध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण करणारे आर्वी येथील उद्योजक काँग्रेसच्या किसान आघाडीचे राष्ट्रीय नेते शैलेश अग्रवाल यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वर्धा चंद्रपूर आणि गडचिरोली या तीन जिल्ह्या मिळून होणाऱ्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी कडून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. उद्या सोमवारी ते चंद्रपूर येथे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. महायुतीकडून उमेदवार गुलदस्त्यात आहे. शैलेश अग्रवाल हे काँग्रेस निष्ठावान आहेत. गेल्या दोन्ही लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसकडून उमेदवारी मागितलेली होती. मात्र त्यांना डावलण्यात आलेले होते. यापूर्वीच्या लोकसभा निवडणुकीत त्यांना शेवटल्या क्षणी तिकीट नाकारल्याने त्यांनी बसपाकडून निवडणूक लढवली होती. गेल्या लोकसभेतही त्यांनी उमेदवारी मागितली होती.

वर्धा लोकसभा मतदारसंघ हा महाविकास आघाडीत काँग्रेसकडे असावा यासाठी त्यांनी प्रचंड संघर्ष केला परंतु हा मतदारसंघ अखेर शरद पवार गट (राष्ट्रवादी काँग्रेस) बहाल करण्यात आला. नगरपालिका निवडणुकीतही त्यांनी आर्वी येथे काँग्रेसचा तंबू ठोकला होता. परंतु, पक्षांतर्गत राजकारणात त्यांना कायम डावलल्या जात होते. परंतु, त्यांनी पक्षनिष्ठा कायम ठेवत काँग्रेससाठी काम केले. गेल्या दोन दिवसांपासून शैलेश अग्रवाल यांना महाविकास आघाडी कडून उमेदवारी मिळण्याची शक्यता वाढली होती. काल सायंकाळी त्यांना महाविकास आघाडी करून स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी वर्धा चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील होणाऱ्या निवडणुकीत उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे त्यांनीही पहिली लढाई जिंकली असेच म्हणावे लागेल. शैलेश अग्रवाल यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महायुतीकडून उमेदवार कोण याची चर्चा जोर धरू लागली आहे. गेल्यास आणि स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वर्धेतून महाविकास आघाडी करून इंद्रकुमार सराफ यांनी निवडणूक लढवली होती तर महायुतीकडून रामदास आंबटकर यांनी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत रामदास आंबटकर विजयी झाले होते.