मोठी घोषणा! अहिल्यादेवी होळकरांचा जीवनपट आता पडद्यावर

    दिनांक :31-May-2026
Total Views |
अहिल्यानगर
Ahilyadevi Holkar अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. राज्यभरातून आलेल्या भाविक, मान्यवर आणि राजकीय नेत्यांच्या उपस्थितीत हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपट शासनाच्या वतीने तयार करण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली.
 

Ahilyadevi Holkar  
सुनेत्रा पवार यांनी आपल्या भाषणात अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव करताना सांगितले की, त्यांनी समाजात क्रांतिकारी बदल घडवून आणत सर्व घटकांना न्याय मिळवून देण्याचे कार्य केले. महिलांच्या सक्षमीकरणाला चालना देत देशभरातील अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार करण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांनी केले असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी राज्यातील नद्या जोडून दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्पही व्यक्त केला.
दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी Ahilyadevi Holkar  यावेळी वैयक्तिक भावनाही व्यक्त केल्या. चौंडी येथे यापूर्वीही आल्याची आठवण सांगताना, राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून येथे उपस्थित राहण्याचा मान मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. अजित पवार यांच्या आठवणींनी त्या भावूक झाल्या असून, अहिल्यादेवींचा जीवनपट हा आपल्यासाठी आदर्श दीपस्तंभ असल्याचे त्यांनी नमूद केले.कार्यक्रमात विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी चौंडीच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाल्याची माहिती दिली. लवकरच विविध विकासकामांचे भूमिपूजन होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 1992 साली या जयंती उत्सवाला मिळणारा अल्प प्रतिसाद आता राज्यस्तरीय स्वरूपात पोहोचल्याचे त्यांनी अधोरेखित केले.