- अभिनेत्री तेजस्विनी पंडीत यांच्या हस्ते महाराष्ट्र उद्योग रत्न पुरस्काराने सन्मानित
गोंदिया,
Anand Chandrikapure भाजपा गोरेगाव तालुका सचिव तथा वास्तूरचना कंन्स्ट्रक्शन कंपनीचे संचालक उद्योगपती आनंद लक्ष्मणराव चंद्रिकापूरे यांना नाशिक येथे शनिवारी 30 मे रोजी आयोजित पुरस्कार सोहळ्यात महाराष्ट्र उद्योग रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री तेजस्विनी पंडीत यांच्याकडून चंद्रिकापुरे यांंनी हा पुरस्कार स्विकारला.
Anand Chandrikapure महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीत मोलाचे योगदान देणान्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा गौरव करणारा मानाचा महाराष्ट्र उद्योग रत्न पुरस्कार 2026 सोहळा नाशिक येथील 7 रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये मोठ्या दिमाखात पार पडला. रिजल इन या संस्थातर्फे आयोजित या भव्य सोहळ्यात पूर्व विदर्भातील सुप्रसिद्ध उद्योजक व समाजसेवक इंजि. आनंद चंद्रिकापुरे यांना सुप्रसिद्ध मराठी अभिनोत्री तेजस्विनी पंडित यांच्या हस्ते या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रोजगार निर्मिती, सामाजिक बांधिलकी आणि विकासाभिमुख विचारांचा आदर्श, उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची राज्यस्तरीय दखल घेत सदर पुरस्कार देण्यात आला असून हा केवळ एका व्यक्तीचा सन्मान नसून उद्योग, रोजगार, सामाजिक उत्तरदायित्व आणि विकासाच्या ध्येयाने झटणार्या प्रत्येक कर्तृत्ववान हाताचा गौरव आहे. आज महाराष्ट्राला प्रगतीच्या नव्या शिखरावर नेण्यासाठी ज्या ध्येयवेड्या व्यक्तिमत्त्वांनी संघर्ष, परिश्रम आणि दूरदृष्टीच्या बळावर नवे मापदंड निर्माण केले, त्यामध्ये आनंद चंद्रिकापुरे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. उद्योग क्षेत्रातील त्यांचे योगदान हे केवळ आर्थिक विकासापुरते मर्यादित नसून समाजातील सर्वसामान्य घटकांच्या सक्षमीकरणाशी जोडलेले आहे. रोजगार निर्मिती, सामाजिक बांधिलकी आणि विकासाभिमुख विचारांच्या माध्यमातून त्यांनी उभा केलेला आदर्श हा अनेकांसाठी प्रेरणास्थान असल्याचे मत त्यांच्या चाहत्यांनी यावेळी व्यक्त करत अनेकांनी चंद्रिकापूरे यांचे अभिनंदन केले आहे.