आ. वानखेडेंचे कौशल्य पुन्हा सिद्ध
आर्वी,
Arvi : ‘Mann Ki Baat’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या लोकप्रिय कार्यक‘माच्या १३४ व्या भागातही आर्वी विधानसभा क्षेत्राने महाराष्ट्रात तिसर्यांदा प्रथम क‘मांक पटकावला. विशेष म्हणजे, यापूर्वीच्या १३२ व्या आणि १३३ व्या भागातही आर्वी अव्वल होते. आ. सुमित वानखेडे यांच्या कुशल व सूक्ष्म नियोजनामुळे आणि अद्वितीय संघटन कौशल्यामुळे ग‘ामीण मतदारसंघाने मोठ्या महानगरांना मागे टाकत अख्ख्या महाराष्ट्रात पक्षांतर्गत आघाडी घेतली.
आज झालेल्या १३४ व्या मन की बात कार्यक‘मातील उपलब्ध सांख्यिकीय अहवालानुसार, राज्यात १३ हजार ३९७ बूथ वर तब्बल २ लाख ६९ हजार १०६ पक्ष कार्यकर्त्यांंनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला. या अभियानात आर्वी विधानसभा मतदार संघातील ३१० पैकी ३१० बूथवरही मन की बात यशस्वी आयोजन करण्यात आले. आर्वी मतदार संघातून ६ हजार ८८७ नागरिकांनी एकत्र येत हा कार्यक‘म ऐकला. आ. वानखेडे यांनी आखलेल्या अचूक रणनीतीमुळे प्रत्येक बूथवर नागरिकांची व कार्यकर्त्यांची विक‘मी उपस्थिती राहिली. आर्वी, आष्टी व कारंजा तालुयातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे शय झाले आहे. मतदारसंघातील सर्व बूथ प्रमुख, शती केंद्रप्रमुख, पंचायत समिती व जिल्हा परिषद सर्कल प्रमुख, जिल्हा व तालुका पदाधिकारी, मंडळ अध्यक्ष, तसेच भाजयुमोचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
Arvi : ‘Mann Ki Baat’ मोठ्या शहरी भागांमध्ये संसाधनांमुळे अशा कार्यक‘मांना मोठी सं‘या लाभते. पण, आर्वी सार‘या ग‘ामीण मतदार संघाने सलग तीन वेळा राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवणे, ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. या यशाबद्दल आ. वानखेडे यांनी आर्वी, आष्टी आणि कारंजा तालुयातील भाजपच्या कार्यकर्त्यांचे, पदाधिकार्यांचे आणि भारतीय जनता पक्षाच्या विचारांवर श्रद्धा ठेवणार्या नागरिकांचे आभार मानले आहेत.