माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांची नंददीप फाऊंडेशनला 50 हजारांची मदत

    दिनांक :31-May-2026
Total Views |
वणी, 
Assistance to Nanddeep Foundation समाजातील बेघर, निराधार, मनोरुग्ण व मतिमंद बांधवांच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या नंददीप फाऊंडेशनला वणीचे माजी आमदार तथा लायन्स इंग्लिश मिडियम स्कूलचे अध्यक्ष संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी 50 हजारांची आर्थिक मदत प्रदान केली. मागील महिन्यात वणी येथे आयोजित सत्कार समारंभात ‘नंददीप’च्या सेवाकार्याची चित्रफीत प्रदर्शित करण्यात आली होती. बेघर, निराधार, निराश्रित, मनोरुग्ण आणि मतिमंद बांधवांसाठी सुरू असलेल्या या कार्याची माहिती पाहून उपस्थितांसह बोदकुरवार भावूक झाले होते. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात नंददीपच्या सेवाकार्यासाठी 50 हजारांची मदत देण्याची घोषणा केली होती.
 
 
 
borkuknd
 
Assistance to Nanddeep Foundation  दिलेला शब्द कृतीत उतरवत त्यांनी यवतमाळ येथे नंददीप फाऊंडेशनला प्रत्यक्ष भेट देऊन 50 हजारांचा धनादेश संस्थेकडे सुपूर्द केला. यावेळी त्यांनी संस्थेच्या अभिप्राय पुस्तकात प्रेरणादायी शेरा लिहून सेवाकार्याबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त केली. समाजातील दुर्लक्षित, उपेक्षित आणि बेघर नागरिकांच्या पुनर्वसनासाठी कार्य करणाèया संस्थांना अशा प्रकारचे सहकार्य मिळणे अत्यंत महत्त्वाचे असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. संजीवरेड्डी यांच्या या मदतीमुळे केवळ आर्थिकच नव्हे तर समाजातील दानशूर व्यक्तींनाही सेवाकार्यात सहभागी होण्याची प्रेरणा मिळाली. नंददीप परिवाराने माजी आमदार बोदकुरवार यांचे आभार मानत त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले. त्यांच्या या सहकार्यामुळे अनेक गरजूंना नव्या आशेचा किरण मिळाल्याची भावना संस्थेच्या वतीने व्यक्त करण्यात आली.