अनिल कांबळे
नागपूर,
Attempted Murder लकडगंज पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील हलबा बारमध्ये रविवारी रात्री चार जणांनी एका युवकावर प्राणघातक हल्ला करीत खून करण्याचा प्रयत्न केला. आराेपींनी युवकाच्या डाेक्यात काचेची बाटली फोडली. या प्रकरणी पाेलिसांनी गुन्हा दाखल केला. ही घटना 31 मे राेजी रात्री सुमारे 8.30 वाजताच्या सुमारास घडली. जखमी युवकाची ओळख रुपेश साेनी अशी असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
(संग्रहित छायाचित्र)
Attempted Murder प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बारमध्ये काही कारणावरून वाद निर्माण झाला हाेता. सुरुवातीला किरकाेळ असलेला हा वाद काही क्षणांतच हिंसक बनला. चार आराेपींनी रुपेश साेनी याला घेरून त्याच्यावर हल्ला केला. यावेळी आराेपींपैकी एकाने त्याच्या डाेक्यावर काचेची बाटली ाेडली. हल्ल्यानंतर बार परिसरात एकच गाेंधळ उडाला. गंभीर जखमी अवस्थेतील रुपेश याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटना घडल्यानंतर चारही आराेपी घटनास्थळावरून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच लकडगंज पाेलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. बारमधील तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून आराेपींची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.