अनिल कांबळे
नागपूर :
Car Accident आयटी पार्क बसस्टाॅपजवळ भरधाव कार चालकाने दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील तरुण आणि त्याची महिला सहकारी दाेघेही गंभीररित्या जखमी झालेत. माहितीनुसार, निहाल शकील शेख (28, आनंदनगर, गिट्टीखदान) हे आयटी पार्क येथील अलकेटी ई-काॅमर्स साेल्यूशन कंपनीमध्ये कार्यरत आहेत. 30 मे राेजी पहाटे 3.40 वाजता निहाल हे त्यांची सहकारी साेनिया किरत शाह (30) हिला दुचाकीवर मागे बसवून कंपनीच्या गेटजवळ अंबाझरी राेडवर उभे हाेते.
Car Accident यावेळी अंबाझरी राेडने येणाèया कारच्या चालकाने निहाल यांच्या दुचाकीला मागून जाेरदार धडक दिली. दुचाकीवरील निहाल आणि साेनिया दाेघेही रस्त्यावर ेकले गेले आणि गंभीर जखमी झाले. अपघातानंतर कारचालक घटनास्थळावरून पळून गेला. परिसरातील नागरिकांच्या मदतीने दाेन्ही जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या जखमी निहाल शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून प्रतापनगर पाेलिसांनी अज्ञात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.