पाच घरांना भेटी, वास्तविक माहिती देण्याचे आवाहन
चंद्रपूर,
Collector Vasumana Pant visited Chota Nagpur प्रशासनाकडून सध्या जिल्ह्यात जनगणनेचे काम सुरू आहे. यात प्रगणक, पर्यवेक्षक घरोघरी जावून कुटुंब, नागरिकांची माहिती घेत आहेत. या कामाची प्रत्यक्ष पाहणी व जमिनीवरील अडचणी जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी, चंद्रपूर तालुक्यातील छोटा नागपूर या गावाला भेट देऊन कामाची प्रगती जाणून घेतली.
सन 2011 च्या जनगणनेनंतर तब्बल 15 वर्षांनी जनगणना करण्यात येत आहे. यात 1 मे ते 15 मे 2026 या कालावधीत स्व-गणना करण्याची सोय नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यानंतर पहिल्या टप्प्यात 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत प्रत्यक्ष घरी भेट देऊन जनगणनेचे काम करण्यात येत आहे. या राष्ट्रीय कामाची प्रगती तसेच फिल्डवर येत असलेल्या अडचणी जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकार्यांनी छोटा नागपूर या गावातील पाच घरांना भेटी दिल्या. प्रगणक यांच्यामार्फत सुरू असलेली जनगणना अचूक होत आहे का, याची त्यांनी स्वतः पडताळणी केली. जनगणनेच्या कामासाठी घरी येणारे प्रगणक आणि पर्यवेक्षकांना, नागरिकांनी वास्तविक माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी पंत यांनी केले. कामात काही अडचणी येत आहेत का, याची विचारणा केली असता, कोणतीही अडचण येत नसल्याचे प्रगणक आणि पर्यवेक्षकांनी सांगितले. यावेळी चंद्रपूरचे तहसीलदार विजय पवार, प्रगणक कैलास कांबळे, पर्यवेक्षक विशाल दुपारे, छोटा नागपूरच्या सरपंच रंजना जुनघरे, उपसरपंच ऋषभ दुपारे, पोलिस पाटील राजकुमार सागवडे, ग्रामसेवक तुषार बागुळे, तलाठी सीमा नगराळे, तसेच किरण अलोणे, रेखा कांबळे आदी उपस्थित होते.
पहिल्या टप्प्यात घर, मालमत्तेशी संबंधित प्रशन
Collector Vasumana Pant visited Chota Nagpur पहिल्या टप्प्यात घर, कुटुंबातील भौतिक सुविधा आणि मालमत्तेशी संबंधित महत्त्वाचे प्रश्न विचारले जात आहेत. ज्याा नागरिकांनी 1 ते 15 मे या कालावधीत पोर्टलवर स्वतःहून ऑनलाईन माहिती भरली आहे, त्यांचा एक ‘युनिक आयडी’ तयार झाला आहे. प्रगणक घरी आल्यानंतर केवळ आपला ‘युनिक आयडी’ क्रमांक त्यांना सादर करायचा आहे. तर ज्या नागरिकांनी माहिती भरली नाही, त्यांची माहिती प्रगणक स्वतः त्यांच्या घरी जाऊन डिजिटल उपकरणांद्वारे सुरक्षितपणे संग्रहित करीत आहेत. घरांची आणि घरात असलेल्या सुविधांच्या माहितीचा हा पहिला टप्पा 14 जून रोजी संपल्यानंतर, प्रत्यक्ष लोकसंख्येची गणना ही 1 फेब्रुवारी 2027 मध्ये पार पडणार आहे.