मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांचे कठोर कारवाईचे आदेश

    दिनांक :31-May-2026
Total Views |
नवी दिल्ली
Delhi building collapse दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी रविवारी दक्षिण दिल्लीतील साकेत येथे शनिवारी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या घटनास्थळाला भेट दिली, ज्यात चार जणांचा मृत्यू झाला होता. दिल्ली सरकारने या घटनेची दंडाधिकारी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या घटनेप्रकरणी एक फौजदारी गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. मेहरौली पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला असून, मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार दक्षिण जिल्हाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली तपास केला जाईल.
 

Delhi building collapse 
शनिवारी साकेत मेट्रो स्टेशनजवळ तीन मजली व्यावसायिक इमारत कोसळून चार जणांचा मृत्यू झाला. इतर नऊ जणांना वाचवण्यात आले. मुख्यमंत्र्यांनी मदत आणि बचाव कार्याचा आढावा घेतला आणि अधिकाऱ्यांना बाधित लोकांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले.एमसीडीच्या दक्षिण विभागाच्या उपआयुक्तांच्या आदेशानुसार, शनिवारी सैदुलाजाब परिसरात कोसळलेल्या इमारतीच्या देखरेखीत निष्काळजीपणा केल्याबद्दल सहायक अभियंता (इमारत) सुदेश सिंह चौहान आणि कनिष्ठ अभियंता (इमारत) अमन जैन यांना निलंबित करण्यात आले आहे.
स्थानिक रहिवाशांनी दावा केला आहेDelhi building collapse  की, कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अजूनही काही लोक अडकले असण्याची शक्यता आहे. रेखा गुप्ता यांनी सांगितले की, संबंधित यंत्रणा कसून शोध आणि बचाव कार्य करत आहेत. रहिवाशांनी परिसरातील अनियंत्रित बेकायदेशीर बांधकाम आणि अनेक इमारतींमधील अपुऱ्या सुरक्षा उपायांबद्दलही चिंता व्यक्त केली.मुख्यमंत्री रेखा गुप्ता म्हणाल्या, "सर्व बेकायदेशीर इमारती आणि त्यासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल." त्यांनी अधिकाऱ्यांना परिसरातील जीर्ण आणि धोकादायक इमारतींची पाहणी करून आवश्यक तेथे कठोर कारवाई करण्याचे निर्देशही दिले. दिल्लीचे गृहमंत्री आशिष सूद म्हणाले की, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. अडकलेल्या लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी आणि बाधित कुटुंबांना तात्काळ मदत पुरवण्यासाठी सर्व यंत्रणा समन्वयाने काम करत आहेत. "सर्व उपलब्ध संसाधने तैनात करण्यात आली असून, बचावकार्य कोणत्याही अडथळ्याविना सुरू आहे," असे ते म्हणाले.