कार्यकर्त्यांनी आत्मविश्वास परीश्रम ध्येयाने पक्षाची वाटचाल करावी : दिनेश सुर्यवंशी

    दिनांक :31-May-2026
Total Views |
बुलढाणा, 
Dinesh Suryavanshi जनसंघाची स्थापना झाली तेव्हा सर्वच विचारसरणीचे पक्ष होते. एकमेव कार्यकर्त्यांवर आधारीत वैचारीक पक्ष जनसंघ होता.महात्मा गाधींच्या हत्येनंतर इंदिरा गाधींनी देशात आणिबाणी लावली. लाखो कार्यकर्त्यांना अटक केली द्वेश, अंहकाराचे राजकारण करण्यात आले. त्यानंतर भाजपची स्थापना झाली. अंत्यत प्रतिकुल परीस्थितीत पक्षसंघटन कार्यकर्ते निर्माण करण्यासाठी पंडीत दिनदयाल उपाध्याय, शामाप्रसाद मुखर्जी, अटलजी, नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी प्रचंड आत्मविश्वसाने संघटन उभे केले. कार्यकर्त्यांनी पद मिळाले नाही म्हणून निराश न होता आत्मविश्वास परिश्रम ध्येयाने वाटचाल करावी असे दुसर्‍या सत्रात भारताचा इतिहास आणि विकास या विषयावर मार्गदर्शन करतांना दिनेश सुर्यवंशी यांनी आर्वजून सांगितले.
 
 
Dinesh SuryavanshiDinesh Suryavanshi
 
Dinesh Suryavanshi  भारतीय जनता पार्टी पंडीत दिनदयाल उपाध्याय महाप्रशिक्षण अभियान जिल्हावर्ग उदघाटन सत्राच्या दुसर्‍या सत्रात ते बोलत होते. व्यासपीठावर सुरेश अप्पा खबुतरे उपस्थित होते. तिसर्‍या सत्रात पक्षाच्या कार्यपद्धती या विषयावर बोलतांना जिल्हा प्रभारी जयंत डेहनकर यांनी प्रशिक्षणातून कच्चा कार्यकर्ता पक्का व समर्पित कार्यकर्ता संकल्पीत झाला पाहिजे हा उद्देश पक्षाचा आहे. जंगलाचा राजा सिंह एकटाच निर्भिडपणे चालतो. परंतू त्याचे लक्ष प्रत्येक प्राण्याकडे असते. दहा पाऊलानंतर तो वळून बघतो. निरीक्षण करतो असे सिंहावलोकन कार्यकर्त्यांनी केले पाहिजे. मुल्यांकन करतांना लोक पक्षाचे जनप्रतिनिधी प्राथमिक सदस्य संख्या किती सभा, मेळावा, बैठकीला गर्दी कीती कार्यकर्ता किती प्रशिक्षीत आहे हे बघतो. त्यात भाजपा आघाडीवर आहे. पाच पिढ्याच्या बलिदानाने प्रत्यनांची परीकष्ठा करून पक्षाला मिळालेले यश हे कार्यकर्त्यांच्या भरवश्यावर आहे. कार्यकर्ता मजबूत झाला पाहिजे शुन्यातून विश्व निर्माण करा असा संदेश त्यांनी दिला. या शिबिरात शुभेच्छा संदेश देतांना कामगार मंत्री अ‍ॅड. आकाश फुंडकर यांनी बदलत्या काळात कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दर पाच वर्षांनी पत्येक निवडणुकीचे मुद्दे वेगळे असतात त्यावर चिंतन मनन शिबिरातून होते. येणारी जिप, पस निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन प्रत्येकाने सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन त्यांनी केले.