100 कोटींच्या क्लबच्या उंबरठ्यावर ‘दृश्यम 3’

    दिनांक :31-May-2026
Total Views |

Drishyam 3
 
 
मुंबई,
Drishyam 3 on 100 crore club सस्पेन्स थ्रिलर चित्रपटांच्या मालिकेत पुन्हा एकदा मोहनलाल स्टारर ‘दृश्यम 3’ने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. प्रदर्शित झाल्यापासूनच या चित्रपटाला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून बॉक्स ऑफिसवर त्याची कमाई सातत्याने मजबूत राहिली आहे. विकेंडमध्ये पुन्हा एकदा कमाईत वाढ झाल्याने चित्रपटाने आपली पकड कायम ठेवली आहे. दिग्दर्शक जीतू जोसेफ यांच्या या बहुप्रतिक्षित चित्रपटाने पहिल्याच दिवशी 15.85 कोटींची दमदार कमाई केली होती. त्यानंतर आठवडाभर चित्रपटाच्या कमाईत चढ-उतार पाहायला मिळाले, मात्र एकूण आकडा सतत वाढत राहिला. विशेष म्हणजे दहाव्या दिवशी चित्रपटाने 5.05 कोटींची कमाई करत पुन्हा एकदा चांगली झेप घेतली आहे.सॅकनिल्कच्या ट्रेंडिंग रिपोर्टनुसार, ‘दृश्यम 3’ने आतापर्यंत भारतात सुमारे 91.30 कोटी (नेट कलेक्शन) कमावले असून लवकरच हा चित्रपट 100 कोटींचा टप्पा पार करेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. विकेंडला झालेली कमाईतील वाढ चित्रपटाच्या दीर्घकालीन यशाचे संकेत देत आहे.