तिरुवनंतपुरम,
ED attack case Kerala अंमलबावी संचालनालय अर्थात् ईडी अधिकाऱ्यांच्या वाहनांवरील हल्लाप्रकरणी अटक केलेल्या पाच आरोपींचे जामीन अर्ज केरळ न्यायालयाने फेटाळून लावले. हा हल्ला संघटित होता, ज्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि ते जखमी आहे. तपास यंत्रणेला आव्हान देणाऱ्यांना जामीन देणे धोकादायक ठरू शकते अशी टिप्पणी न्यायालयाने केली.
केरळचे माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या घरावर छापा टाकण्यासाठी आलेल्या ईडी अधिकाèयांच्या वाहनांवर हल्ला करून त्यांचे नुकसान करणाèया पाच आरोपींना अटक करण्यात आली होती. विजयन यांच्या मुलीविरुद्धच्या मनी लाँडरिंग चौकशीचा भाग म्हणून हा छापा टाकण्यात आला होता. आरोपींनी तिरुवनंतपुरमच्या न्यायिक प्रथम वर्ग दंडाधिकाèयाकडे जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र न्यायाधीश तानिया ED attack case Kerala मारियाम जोस यांनी आरोपींना दिलासा देण्यास नकार दिला. त्यांनी म्हटले की, या टप्प्यावर जामीन दिल्यास त्यांना आणि इतर आंदोलकांना भविष्यात अशाच प्रकारची कृत्ये करण्यास प्रोत्साहन मिळेल आणि त्याचा समाजावर परिणाम होईल.