११ स्वस्त धान्य दुकानांत आढळल्या त्रुट्या

    दिनांक :31-May-2026
Total Views |
सर्वाधिक दुकाने सेलू तालुयातील
 
वर्धा, 
Fair price shop  जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांतून गरीब व गरजूंना धान्याचे वितरण होते. हे धान्य वितरण योग्य पद्धतीने व्हावे या हेतूने स्वस्त धान्य दुकानांच्या तपासणीची मोहीम पुरवठा विभागाच्यावतीने राबविण्यात येते. चार महिन्यात जिल्ह्यातील ११ स्वस्त धान्य दुकानांमध्ये विविध त्रुट्या आढळून आल्याने संबंधित दुकानदारांना नियमानुसार कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आले आहे.
 

reshin 
 
जानेवारी ते एप्रिल २०२६ या कालावधीत जिल्ह्यातील ११ स्वस्त धान्य दुकानांमध्ये अनियमितता आढळून आली. संबंधित दुकानदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेल्या तपासणीत सर्वाधिक त्रुट्या सेलू तालुयातील दुकानांमध्ये आढळून आल्या आहे. सेलू तालुयातील तब्बल ६ स्वस्त धान्य दुकानांमध्ये विविध प्रकारच्या त्रुट्या व अनियमितता निदर्शनास आल्या. यामध्ये लाभार्थ्यांना वेळेवर धान्य न देणे, नोंदी अद्ययावत न ठेवणे, वितरण प्रकि‘येत पारदर्शकतेचा अभाव आदी बाबींचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय आर्वी तालुयातील ३ स्वस्त धान्य दुकानांमध्येही त्रुट्या आढळल्याने संबंधितांना नोटीस बजावण्यात आली आहे. वर्धा शहरातील १ तसेच देवळी तालुयातील १ दुकानातही अनियमितता निदर्शनास आली आहे.
 
 
Fair price shop  लाभार्थ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ पारदर्शकपणे मिळावा यासाठी प्रशासन दक्ष असल्याचे सांगण्यात येते. असे असतानाही काही स्वस्त धान्य दुकानदार नियमांना बगल देत असल्याचेही बघावयास मिळते. नोटीस बजावण्यात आलेल्यांकडून समाधानकारक स्पष्टीकरण न मिळाल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले.
 
 
अन्त्योदयच्या लाभार्थ्याला दिले कमी धान्य
देवळी तालुयातील एका स्वस्त धान्य दुकानदाराने अन्त्योदयच्या लाभार्थ्याला कमी धान्य दिल्याची तक‘ार प्राप्त झाल्यावर अधिकार्‍यांनी आकस्मिक भेट देत स्वस्त धान्य दुकानाची पाहणी केली. त्यानंतर संबंधित स्वस्त धान्य दुकान नजीकच्या दुसर्‍या स्वस्त धान्य दुकानाला अटैच करण्यात आले होते. पण या स्वस्त धान्य दुकानदाराने थेट उपा़युतांकडे दाद मागितल्याने आणि स्थगिती मिळाल्याने ते स्वस्त धान्य दुकान आता पूर्ववत सुरू असल्याचे सांगण्यात आले.