नाेकरीचे आमिष दाखवून 31 लाखांची फसवणूक

    दिनांक :31-May-2026
Total Views |
- सुरक्षारक्षकासह तिघांवर गुन्हा दाखल
 
अनिल कांबळे
नागपूर, 
Fraud सुरक्षारक्षक पदावर कार्यरत असलेल्या एका युवकाने वेकाेलीमध्ये (वेस्टर्न काेलिफल्ड्स लिमिटेड) मध्ये व्यवस्थापक पदावर असल्याचे सांगून दाेघांना नाेकरी लावून देण्याचे आमिष दाखवले. दाेन साथिदारांना हाताशी धरुन दाेघांची 31 लाख रुपयांची फसवणूक केली. ही घटना मानकापूर पाेलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणी मानकापूर पाेलिसांनी तीन आराेपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अजित जिन्ना (35, जरबरा, शिव इलाईट, खापरी शासकीय काॅलेजजवळ), वैभव सुरजुसे (26, बाबा फरीदनगर) आणि अमाेल जिराे (26, शांतीनगर) अशी आराेपींची नावे आहेत.
 
 
frauddsks
 
Fraud  माहितीनुसार, गाेवर्धन भाेजराज वरठी (56, शिवनगर, झिंगाबाई टाकळी, गाेधनी) यांच्या मुलीला नाेकरी लावून देण्याचे आमिष आराेपींनी दाखवले. मुख्य आराेपी अजित जिन्ना याने डब्लूसीएल जरीपटका येथे मॅनेजर असल्याचे खाेटे सांगितले. त्याचा विश्वास पटवून देण्यासाठी आराेपी अमाेल जिराे याने वरठी यांच्या घरी जाऊन स्वत: डब्लूसीएलचा माेठा अधिकारी असल्याचे सांगत मुलीचे व्हेरििफकेशन केले. तसेच आराेपी वैभव सुरजुसे याने डब्लूसीएलचे कार्यालयीन सही-शिक्के असलेले बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र वरठी यांच्या घरी नेऊन दिले. या पत्राच्या आधारे गाेवर्धन वरठी यांनी आपल्या मुलीची खासगी रुग्णालयातून वैद्यकीय तपासणीही करून घेतली. या बनावट प्रक्रियेच्या बदल्यात आराेपींनी गाेवर्धन वरठी यांच्याकडून आरटीजीएस आणि ाेन पेद्वारे 17 लाख उकळले. मात्र, दीर्घकाळ हाेऊनही मुलीला नियुक्तीपत्र न मिळाल्याने वरठी यांनी जेव्हा जरीपटका येथील डब्लूसीएल कार्यालयात जाऊन थेट चाैकशी केली, तेव्हा त्यांना धक्काच बसला. स्वत:ला मॅनेजर सांगणारा अजित जिन्ना हा तिथे केवळ एक सुरक्षारक्षक असल्याचे समाेर आले.
 
 
दुसऱ्याला 14 लाखांनी फसवले
पाेलिस तपासात या टाेळीने केवळ वरठी यांचीच नव्हे, तर अशाच प्रकारे शुभम मरगदे यांच्या लहान भावालाही नाेकरीचे आमिष दाखवले हाेते. बनावट दस्तऐवज देऊन मरगदे यांच्याकडूनही आराेपींनी 14 लाख उकळले हाेते. आराेपींनी संगनमत करून 13 जून 2023 ते 18 डिसेंबर 2023 दरम्यान या दाेन्ही कुटुंबांची मिळून 31 लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी पीडितांनी दिलेल्या तक्रारीवरून तीनही आराेपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.