११ गुन्हेगारांच्या घरी आढळला शस्त्रसाठा

    दिनांक :31-May-2026
Total Views |
गुन्हे दाखल
वर्धा, 
Illegal Arms Cache जिल्हा पोलिस दलातर्फे दोन दिवस विशेष मोहीम राबवून स्वतःजवळ अवैधरित्या शस्त्र बाळणार्‍या सराईत गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. यामध्ये तब्बल ११ सराईत गुन्हेगारांच्या घरी शस्त्र आढळून आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. २०२१ पासून आजपर्यंत स्वतःजवळ अवैधरीत्या शस्त्र बाळगून गुन्हे करणार्‍या गुन्हेगारांना तपासण्याची विशेष मोहीम वर्धा जिल्हा पोलिस दलातर्फे २३ आणि २४ मे रोजी राबविण्यात आली.
 
 
fir
 
Illegal Arms Cache  मोहीमेदरम्यान ८४२ गुन्हेगारांना तपासण्यात आले. त्यापैकी ३८१ गुन्हेगारांच्या घरांची झडती घेण्यात आली. त्यामध्ये जुनेद पठाण रा. इंदिरानगर आर्वी नाका, ०राहुल जाधव, रा. वडार झोपडपट्टी, आर्वी नाका, निखील गोमा गुजेवार, रा. पिपरी (मेघे) , क्रिष्णा वाटघुडे रा. सिंदी (मेघे), गोकुळ बावणे रा. गुंजखेडा, पुलगा, रोहीत नाईक रा. सुभाषनगर पुलगाव, प्रसाद उर्फ यश पराते रा. न्यू रेल्वे कॉलनी, अमित कुमरे रा. संत तुकाराम वार्ड, रामनगर, तुषार प्रभाकर बादलमवार, रा. संत तुकाराम वार्ड, अंकुश तिरपुडे रा. हिंदनगर, सौरभ गावंडे, रा. भाईमारे ले आऊट यांच्या घरात शस्त्र आढळून आले. या मोहिमेमुळे अवैधरित्या शस्त्र बाळगून गुन्हे करणार्‍या गुन्हेगारांवर वचक निर्माण झाला आहे.