भारतीय लष्कराची जम्मू-काश्मीरमध्ये कारवाई

    दिनांक :31-May-2026
Total Views |
श्रीनगर,
Indian Army जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावत सुरक्षा दलाने तीन जणांना अटक केली. जम्मू-काश्मीर पोलिस आणि भारतीय लष्कराच्या जवानांनी ही कारवाई केली.
 

Indian Army, Jammu and Kashmir 
गोपनीय माहितीच्या आधारे उरी परिसरातून सीमा पार करणाèया तीन जणांना पकडण्यात आल्याची माहिती भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सने एक्सवरील पोस्टमधून दिली. दहशतवाद्यांच्या शोधात मोहीम सुरू असताना ही कारवाई करण्यात आली. कथितरित्या दोन आरोपी घुसखोरी करण्याचा Indian Army प्रयत्न करत होते. या कारवाईदरम्यान त्यांच्या स्थानिक एका मार्गदर्शकालाही अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. अटक केलेले दोघे व्याप्त काश्मीर येथील रहिवासी आहे. पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.