तरुणांच्या योगदानातून भारत बलशाली

मन की बात कार्यक्रमातून पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन, खगोलशास्त्रावरही भाष्य

    दिनांक :31-May-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Narendra Modi प्रत्येक क्षेत्रात तरुणांचे योगदान वाढत असून, यामुळे भारताची वाटचाल विकसित राष्ट्राच्या दिशेने सुरू आहे. देशाचे खेळाडू नवीन विक्रम मोडत आहेत. देशातच नव्हे, तर परदेशातही भारतीय तरुणांच्या प्रतिभेचा बोलबाला आहे. देशाचे खेळाडू नवीन विक्रम मोडत असून, त्यांनी जागतिक ओळख निर्माण केल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात कार्यक्रमात म्हणाले.
 

Narendra Mod 
रेडिओवर प्रसारित मन की बातच्या 134 व्या भागात देशवासीयांना संबोधित करताना मोदी यांनी भारतीय खेळाडू गुरिंदरवीर सिंग आणि अनिमेश कुजूर यांच्याशी झालेल्या संभाषणाचाही उल्लेख केला. तरुणांच्या वाढत्या उत्साहाची आणि त्यांनी प्रस्थापित केलेल्या नवीन विक्रमांची प्रशंसा केली. नेदरलँड्ससह पाच देशांच्या अलीकडील दौèयातील अनुभव सांगताना ते म्हणाले, परदेशात भारतीयांनी प्रतीभेच्या जोरावर निर्माण केलेली स्वतःची ओळख पाहून मी भारावून गेलो. ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे. नेदरलँड्समध्ये आयोजित एका विशेष समारंभात चोळ काळातील प्राचीन ताम्रपट भारताला परत करण्यात आले. समृद्ध Narendra Modi  इतिहासाचा आणि संस्कृतीचा आम्हा सर्वांना अभिमान आहे. भारताचा हा अमूल्य वारसा जपण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. याच संदर्भात, ज्ञान भारतम अभियान अंतर्गत छत्तीसगडमधील मल्हार येथे एक महत्त्वाचा शोध लागला आहे. येथे तीन दुर्मिळ ताम्रपट सापडले असून, ते पांडुवंशी घराण्यातील महर्षी बलारजुन यांच्या कारकिर्दीशी संबंधित असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
खगोलशास्त्राचा संदर्भ Narendra Modi  देत पंतप्रधान म्हणाले, भारतीयांना खगोलशास्त्राबद्दल नेहमीच विशेष आकर्षण राहिले आहे. आपल्या देशात जुन्या वेधशाळा आजही अस्तित्वात आहेत, जिथे गणिताचे अद्भुत शोध लागले आहेत. नौकानयन असो, दिनदर्शिका असो किंवा आपले सण असोत, या सर्वांचा संबंध आकाश आणि ताèयांशी आहे. मी बंगळूरु अ‍ॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीबद्दल जाणून घेतले आहे, जिथे निरीक्षण सत्रे आयोजित केली जातात. देशभरात खगोलशास्त्र क्लब अधिकाधिक लोकप्रिय होत आहेत.
 
 
गिरिजा अम्मा कार्य प्रेरणास्पद
तामिळनाडूतील नागरकोविल येथील शिक्षिका गिरिजा अम्मा सुमारे 15 शाळा चालवतात, त्यापैकी चेन्नईतील जयगोपाल गारोडिया हिंदू विद्यालय ही सर्वात Narendra Modi  प्रमुख आहे. त्यांची देशभक्तीची भावना प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देते. त्यांनी देशाच्या अनेक सैनिकांसाठी योगदान देण्याची प्रतिज्ञा केली. यासाठी, त्यांनी त्यांच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रेरित केले. त्यांनी मुलांना शूर सैनिकांसाठी दररोज एक रुपयाचे योगदान देण्यास सांगितले. या योगदानाची रक्कम 40 लाख रुपये झाली.