भीषण अपघात मराठा आंदोलकाचा मृत्यू

    दिनांक :31-May-2026
Total Views |
जालना
Maratha reservation जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनानंतर परतीच्या प्रवासात झालेल्या भीषण रस्ते अपघातात एका मराठा आंदोलकाचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा परिसरात हा अपघात घडला.
 

Maratha reservation 
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरू केल्यानंतर मोठ्या प्रमाणात आंदोलक जमा झाले होते. रात्री उशिरा सरकारकडून काही मागण्या मान्य झाल्यानंतर उपोषण स्थगित करण्यात आले आणि आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानंतर अनेक आंदोलक आपल्या गावी परतत होते.याच दरम्यान इंदापूर तालुक्यातील रामचंद्र शंकर जमदाडे हे आपल्या सहकारी संतोष माने आणि बिपीन मोरे यांच्यासोबत कारने परतत असताना बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा परिसरात त्यांच्या वाहनाची रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला मागून जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की रामचंद्र जमदाडे यांचा जागीच मृत्यू झाला, तर वाहनातील इतर दोन जण गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती Maratha reservation  मिळताच स्थानिक मराठा समन्वयक आणि कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने बीड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्या उपचाराची जबाबदारी समन्वयकांनी स्वीकारल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.