जालना,
Jalna road accident, जालना जिल्ह्यातील जाफराबाद-चिखली मार्गावर पहाटे एका कारचा भीषण अपघात झाला. माहिती नुसार, ३५ वर्षीय नितिन प्रभाकर गवळी आपल्या कारने मार्गावर प्रवास करत असताना अचानक वाहनाचे नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला आदळली. या धडकामुळे कारमध्ये आग लागली आणि काहीच क्षणांत कार जळून खाक झाली.
अपघातात कारमधील चालक नितिन गवळी याचा दुर्दैवी मृत्यू झाला. घटनास्थळी धडक इतकी भयानक होती की कार पूर्णपणे नष्ट झाली, तर चालकाला बाहेर पडता आले नाही.घटनास्थळावर जाफराबाद पोलिसांनी त्वरित धाव घेतली आणि पंचनामा तयार केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला, तर दुर्घटनाग्रस्त वाहनाचे निरीक्षण करण्यात आले. प्राथमिक तपासात उघडकीस आले की, चालकाने वाहन भारधाव वेगाने चालवताना नियंत्रण गमावल्यामुळे हा अपघात घडला.
पोलीस अधिकारी सांगतात की, दुर्घटनेमागील सर्व परिस्थिती आणि संभाव्य कारणांचा सखोल तपास सुरू आहे. या भीषण घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, लोक घटनास्थळी जमले आणि आगीच्या लपेटीत कारचे जळणे पाहून हादरले.