कंगना रणौतच्या आगामी चित्रपटात झळकणार या मराठी अभिनेत्री

    दिनांक :31-May-2026
Total Views |
मुंबई
Bharat Bhagya Vidhata बॉलिवूडची ‘क्वीन’ अभिनेत्री कंगना रणौत एका अत्यंत हृदयस्पर्शी आणि प्रभावी कथेसह मोठ्या पडद्यावर पुनरागमन करण्यास सज्ज झाली आहे. नुकतंच तिच्या ‘भारत भाग्य विधाता’ या चित्रपटाचं मोशन पोस्टर रिलीज झाले आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात मराठी कलाकारही झळकणार आहेत.
 
 
Bharat Bhagya Vidhata
कंगना यांच्या मणीकर्णिका फिल्मस् प्रोडक्शन हाउसच्या सोशल मीडिया पेजवरून या चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर करण्यात आलं आहे. 2008 साली मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर हा चित्रपट आधारीत आहे. हे. विशेष म्हणजे, यात कामा घडलेल्या थरारक घटनांवर प्रकाश टाकण्यात आलाय. दहशतवाद्यांनी हॉस्पिटलवर हल्ला केला असताना तिथल्या नर्स, वॉर्ड बॉईज, स्वच्छता कर्मचारी आणि सुरक्षारक्षकांनी कशा प्रकारे आपल्या जीवाची बाजी लावून 400 हून अधिक रुग्णांचे प्राण वाचवले, याची ही शौर्यगाथा असणार आहे.भारत भाग्य विधाता हा सिनेमा 12 जून 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे.
मराठी अभिनेत्रींची वर्णी
या चित्रपटात मराठी इंडस्ट्रीतील Bharat Bhagya Vidhata  अनेक अभिनेत्री झळकणार आहेत. यात प्रिया बेर्डे, गिरीजा ओक, स्मिता तांबे, इशा डे, सुहिता थत्ते, आशा शेला या अभिनेत्रींचा समावेश आहे. त्यामुळे या चित्रपटाची उत्सकुता आणखीनच वाढली आहे.