विधान परिषद रिंगणात भाजपा नेत्याची होणार ‘एन्ट्री’

    दिनांक :31-May-2026
Total Views |
आज करणार नामांकन दाखल : काँग्रेसची अपक्ष उमेदवारी ?

यवतमाळ, 
Legislative Council Election यवतमाल जिल्हा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीतील यवतमाळ मतदारसंघात उमेदवारीचा सस्पेन्स कायम आहे. महाविकास आघाडीकडून चर्चेत असलेले साहेबराव कांबळे यांनी शनिवारी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. चार इच्छुकांनी नऊ अर्जांची उचल केली असून यात विधान परिषदेच्या दोन माजी सदस्यांचाही समावेश आहे.
 
 
bjp
 
भाजपाचे उमरखेड तालुक्यातील जिल्ह्याचे नेता म्हणून ओळख असलेले नितीन भुतडा सोमवार, 1 जून रोजी नामांकन दाखल करणार असल्याचे बोलल्या जात आहे. त्यांच्या नामांकनामुळे या होऊ घातलेल्या विधान परिषद निवडणुकीचे चित्र बदलणार आहे. काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी उमरखेड विधानसभा फार थोड्या फरकाने गमावली, त्यामुळे आता त्यांना विधान परिषदेच्या आखाड्यात प्रमोट केले आहे. कांबळे यांनी शनिवारी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून या जागेवर दावा केला आहे. तर भाजपाकडून जिल्हा समन्वयक नितीन भुतडा हे भाजपाच्या सर्व पदाधिकाèयांसोबत सोमवारी नामांकन दाखल करणार आहेत. रविवारी त्यांच्या कार्यालयातून जिल्ह्यातील सर्व भाजपाच्या पदाधिकाèयांना फोन करुन सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपाच्या या नेत्याच्या एन्ट्रीमुळे चांगलीच रंगत येणार असून, त्यांचा विजयसुद्धा निश्चित असल्याचे राजकीय वर्तुळात बोलल्या जात आहे. आतापर्यंत 20 इच्छुकांनी अर्जाची उचल केली असून यापैकी केवळ एक नामांकन अर्ज तोही अपक्ष म्हणून दाखल झाला आहे.
आज होणार दावे निश्चित
Legislative Council Election  महायुतीचीही भूमिका अजूनपर्यंत अधिकृतपणे पुढे आलेली नाही. युतीकडून कोण उमेदवार ही जागा शिवसेनेच्या कोट्यात की ऐन वेळेवर भाजपा दावा करणार हेही कोडे सोमवारी सुटणार आहे. शिवसेनेचे संभाव्य उमेदवार म्हणून सलीम खेतानी यांनी शुक्रवारी नामांकन अर्जाची उचल केली. त्यानंतर शनिवारी माजी आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांनीसुद्धा नामांकन अर्ज घेतला आहे. तसेच माजी आमदार संदीप बाजोरिया यांनीही अर्ज घेतला आहे. उमरखेडचे भाजपा नेते सोमवारी नामांकन दाखल करणार असल्याचे सांगण्यात येत असून भाजपा निश्चित दावा करणार असल्याचे बोलल्या जात आहे.