आनंदवार्ता! लवकरच होणार 'कर्जमाफी'

    दिनांक :31-May-2026
Total Views |
अहिल्यानगर,
Dattatray Bharne राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक घोषणा समोर आली आहे. अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीला येत्या काही दिवसांत सुरुवात होणार असल्याचे संकेत राज्याचे कृषीमंत्री दत्ता भारणे यांनी दिले आहेत. या घोषणेमुळे कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
 

Dattatray Bharne  
अहिल्यानगरमधील चौडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना कृषीमंत्र्यांनी या योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिली. राज्य सरकारने अर्थसंकल्पात ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना’ जाहीर केली होती. त्यानंतर या योजनेच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात येत असून पुढील ८ ते १० दिवसांत कर्जमाफीची प्रक्रिया सुरू होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
 
 
या योजनेअंतर्गत दोन लाख Dattatray Bharne  रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार असल्याची माहिती यापूर्वीच अर्थसंकल्पीय अधिवेशनात देण्यात आली होती. राज्यातील विविध जिल्हा मध्यवर्ती बँका तसेच राष्ट्रीयीकृत बँकांकडून थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती संकलित करण्यात आली असून राज्यस्तरीय बँकर्स समितीचा (SLBC) सविस्तर अहवाल अंतिम टप्प्यात असल्याचेही सांगण्यात येत आहे. या प्रक्रियेमुळे राज्यातील सुमारे २४ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना थेट दिलासा मिळणार आहे.कार्यक्रमादरम्यान बोलताना कृषीमंत्री दत्ता भारणे यांनी स्पष्ट केले की, कर्जमाफीसंदर्भातील अंतिम घोषणा करण्याचा अधिकार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे आहे. मात्र, शेतकऱ्यांना तातडीने माहिती मिळावी या उद्देशाने या योजनेच्या अंमलबजावणीबाबतचा आढावा देण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.दरम्यान, कर्जमाफीची ठोस तारीख समोर आल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या या निर्णयामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.