नवी दिल्ली,
CRPF Cobra battalions मणिपुरात मोहिमेसंबंधी कर्तव्यांसाठी, सीआरपीएफच्या जंगल युद्धातील पारंगत असलेल्या ‘कोब्रा’च्या दोन बटालियन्स तैनात करण्याचा आदेश केंद्राने दिला, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी रविवारी दिली.
मे 2023 पासून मैतेई आणि कुकी-झो गटांमधील वांशिक हिंसाचारात 260 पेक्षा जास्त लोकांचा बळी गेला असून, हजारो लोक बेघर झाले असल्याने या राज्यात चिरस्थायी शांतता प्रस्थापित करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार प्रयत्नरत आहेत.
केंद्रीय गृह मंत्रालयाने CRPF Cobra battalions केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या एका प्रस्तावाला मंजुरी दिली. यानुसार पश्चिम बंगालमधील 207 आणि आसाममधील 210 क्रमांकाच्या बटालियनन्स मणिपूरमध्ये मोहिमांविषयक कर्तव्यासाठी तैनात केल्या जातील. मणिपूरमध्ये हिंसाचार घडवून आणणाèया सशस्त्र गटांविरुद्ध कोब्राच्या दोन बटालियन्स विशिष्ट मोहिमा राबवतील, असे एका वरिष्ठ सुरक्षा अधिकाèयाने सांगितले. या मोहिमांसाठी निश्चित करण्यात आलेली ही पथके पुढील काही आठवड्यांत राज्यात दाखल होतील, असे त्यांनी पुढे नमूद केले. ईशान्येकडील काही राज्यांमधील बंडखोरीव्यतिरिक्त, भारतातील अनेक राज्यांमध्ये उग्र रूप धारण केलेल्या डाव्या विचारसरणीच्या अतिरेकीवादाचा सामना करण्यासाठी सीआरपीएफद्वारे 2008-09 मध्ये ‘कमांडो बटालियन फॉर रिझॉल्युट अॅक्शन’ची स्थापना करण्यात आली. सध्या कोब्राच्या एकूण दहा बटालियन्स कार्यरत आहेत आणि त्या प्रामुख्याने नक्षलविरोधी मोहिमांच्या क्षेत्रात नैनात करण्यात आल्या आहेत.
प्रत्येक बटालियनमध्ये हजार कमांडो
कोब्राची प्रत्येक बटालियनची क्षमता हजार कमांडोंची असते. या बटालियनच्या कमांडोंनी नक्षलवाद्यांविरुद्ध गुप्तचर माहितीवर आधारित यशस्वी जंगल युद्ध आणि गनिमी काव्याच्या मोहिमा राबवल्याचे श्रेय गृह मंत्रालयाने दिले आहे. यामुळे मार्च महिन्यात देशातून माओवादी हिंसाचाराचा अंत झाला.