अमेरिकेच्या मॅसॅच्युसेट्स आकाशात उल्केचा स्फोट

    दिनांक :31-May-2026
Total Views |
मॅसॅच्युसेट्स,
Meteor Explodes in Massachusetts Sky अमेरिकेच्या मॅसॅच्युसेट्स आणि ऱ्होड आयलंड परिसरात शनिवारी अचानक आकाशात मोठा स्फोट झाल्याने नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक भागांमध्ये जोरदार आवाज ऐकू आल्याने इमारती हादरल्याचा अनुभव लोकांनी सोशल मीडियावर शेअर केला.प्राथमिक तपासात अमेरिकन मेटिअर सोसायटीने स्पष्ट केले की हा स्फोट कोणत्याही मानवी घटनेमुळे नसून एका उल्केमुळे झाला आहे. ही उल्का बोस्टनच्या उत्तरेला, न्यू हॅम्पशायरजवळ वातावरणात प्रवेश करताना जळून स्फोटासह फुटली. तिचा आकार साधारण तीन फूट इतका असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
 
 
Meteor Explodes
 
संस्थेच्या तज्ज्ञांच्या मते, हा प्रकार साधारण उल्केपेक्षा अधिक तेजस्वी आणि मोठा होता. डेलावेअरपासून मॉन्ट्रियलपर्यंत अनेक ठिकाणांहून लोकांनी स्फोटाचा आवाज ऐकल्याच्या आणि आकाशात तेजस्वी आगगोळा दिसल्याच्या तक्रारी नोंदवल्या आहेत. काही नागरिकांनी घरांना हादरा बसल्याचा अनुभवही सांगितला आहे.तज्ज्ञांनी सांगितले की, ही उल्का पृथ्वीवर आदळलीच असेल असे ठोसपणे म्हणता येत नाही. बहुतेक ती वातावरणातच जळून नष्ट झाली असावी किंवा समुद्रात पडली असण्याची शक्यता आहे. दरम्यान, सोशल मीडियावरही या घटनेचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले असून दोन मोठे स्फोट ऐकू आल्याचे नागरिकांनी सांगितले. मात्र या घटनेत कोणतेही नुकसान किंवा आग दिसून आली नाही, त्यामुळे हा प्रकार पूर्णपणे नैसर्गिक खगोलीय घटना असल्याचे स्पष्ट होत आहे.