वाशीम,
जिल्ह्यातील वारा जहागीर येथील पै. विदर्भ केसरी विजय शिंदे यांना MLA Shyam Khode आमदार श्याम खोडे यांनी दत्तक घेतले. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून आमदार श्याम खोडे यांनी हा स्तुत्य निर्णय जाहीर केला. पैलवान भाजपा न. प. गट नेते बाळू मुरकुटे, नगरसेवक पै. गजानन लांडगे, पै. महादेव लाभांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पैलवान विजयराज शिंदे यांनी आजपर्यंत विविध ठिकाणी कुस्तीचे मैदान गाजविले आहे. कुस्ती हा भारतीय स्वदेशी खेळ असून, जमिनीशी नाळ घट्ट ठेवणारा हा दुवा आहे. भाजपा आ. श्याम खोडे यांनी विकास कामासोबतच युवकांच्या क्रीडा क्षेत्रांच्या विकासाकडे विशेष लक्ष केंद्रित केले आहे, यापूर्वी त्यांनी शिक्षणासाठी सुद्धा काही गरजवंतांना दत्तक घेतलेले आहे. जोपर्यंत विजय शिंदे हे कुस्तीचा मैदानामध्ये खेळत राहतील तोपर्यंत त्याना आ. खोडे यांनी दत्तक घेतले आहे.
मंगरूळपीर या ठिकाणी सुद्धा MLA Shyam Khode आमदार खोडे यांनी राष्ट्रीय स्तरावर कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले होते. त्यामुळे वाशीम जिल्ह्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर कोरले गेले. संपूर्ण अकरा जिल्ह्यामध्ये प्रथमच एका लोकप्रतिनिधीने क्रीडा क्षेत्राशी संबंधित असलेल्या पैलवानाला दत्तक घेण्याचे दायित्व पार पाडल्याची माहिती पैलवान बाळू मुरकुटे व गजानन लांडगे यांनी दिली आहे. लोकप्रतिनिधी जर क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी पुढे येत असतील तर भविष्यामध्ये वाशीम जिल्ह्यामध्ये चांगले दिग्गज पैलवान ,चांगले खेळाडू निर्माण होतील असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला.
वाशीम येथील जनसंपर्क कार्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमांमध्ये आमदार खोडे यांनी पैलवान विजय शिंदे यांना ११ हजार रुपये रोख रक्कम देऊन सत्कार केला, सोबतच दर महिन्याला आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेऊन जोपर्यंत हा मैदानामध्ये राहील तोपर्यंत आपण त्याला सर्वतोपरी मदत करणार असून, दत्तक घेत असल्याचे जाहीर केले. विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील प्रसिद्ध पैलवान विजय शिंदे यांना महाराष्ट्र चॅम्पियन पुणे, विदर्भ केसरी अचलपूर तर तीन वेळा नागपूर केसरी हा किताब प्राप्त झाला आहे. दहा वर्षापासून कुस्तीच्या मैदानात लढवय्या ठरलेला पैलवान शिंदे हा अनेक गदाचा मानकरी ठरलेला आहे.