मारेगाव,
'mukhyamantryanchi samruddh panchayat raj' abhiyan मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत मारेगाव तालुक्यातील कुंभा व मार्डी ग्रामपंचायतींच्या कामकाजाची पाहणी करण्यासाठी जिल्हास्तर तपासणी समिती मारेगावात दाखल झाली आहे. ग्रामपंचायतींच्या विकासकामांचा दर्जा, प्रशासनातील पारदर्शकता आणि विविध योजनांच्या अंमलबजावणीचे मूल्यमापन करण्यासाठी मार्डी व कुंभा ग्रामपंचायतची तपासणी शुक्रवार, 29 मे रोजी करण्यात करण्यात आली.
या समितीचे गडचिरोली जिल्हा परिषदचे प्रकल्प संचालक राहुल काळभोर आहेत. समितीत उपमुख्य कार्यकारी अधिकारी चेतन हिंवज, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक बानाईत तसेच जिल्हा व्यवस्थापक आकाश चाफले यांचा समावेश होता. या तपासणीवेळी गटविकास अधिकारी भीमराव व्हनखंडे, विस्तार अधिकारी माने, सुधाकर जाधव, मार्डी सरपंच रवीराज चंदनखेडे, उपसरपंच शोभा कालर, पोलिस पाटील डॉ. प्रशांत पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुरेश चांगले, सूरज पंडिले, गणेश कनाके, बेबी मोहुर्ले, छाया पुसाटे, मनीषा चौधरी, मनीषा नागपुरे, मंगला टिपले, ग्रापं अधिकारी रेविचंद जनबंधू, प्रभाकर फुलभोगे, मुख्याध्यापक शेळके व नागरिक उपस्थित होते.
'mukhyamantryanchi samruddh panchayat raj' abhiyan समितीकडून ग्रामपंचायतींचे प्रशासकीय कामकाज, विकासकामांची गुणवत्ता, ग्रामस्वच्छता, पाणीपुरवठा व्यवस्था, आरोग्य व शिक्षण सुविधा, महिला व बालकल्याण योजनांची अंमलबजावणी, लोकसहभाग, ग्रामसभांचे आयोजन तसेच ई-गव्हर्नन्सच्या वापराची तपासणी करण्यात आली. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाèया ग्रामपंचायतींची राज्यस्तरावर निवड करून गौरव करण्यात येणार असल्याने मार्डी ग्रामपंचायतींनी आवश्यक कागदपत्रे, विकासकामांची माहिती आणि विविध योजनांचा अहवाल सादर केला आहे.